Monday, June 22, 2026
Homeकोंढाळाअज्ञात चोरट्यांनी कोंढाळा ग्रामपंचायतीचे अँड्रॉइड मोबाईल केले लंपास…-सायबर सेलकडे तक्रार दाखल; मोबाईल...

अज्ञात चोरट्यांनी कोंढाळा ग्रामपंचायतीचे अँड्रॉइड मोबाईल केले लंपास…-सायबर सेलकडे तक्रार दाखल; मोबाईल परत करावे अन्यथा खावी लागेल जेलची हवा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

कोंढाळा(देसाईगंज) :- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायतीचे अँड्रॉइड मोबाईल एका अज्ञात चोरट्याने ग्रामपंचायत कार्यालयातून चोरून नेले असल्याची घटना काल,मंगळवार दिनांक-२ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने अज्ञात चोरट्या विरुद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत तक्रार दाखल केली असून त्वरित सायबर सेलकडे प्रकरण वळती करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार,मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याकरिता गावातील नागरिकांची झुंबड रहिवासी प्रमाणपत्र,जन्म प्रमाणपत्र व इतर कागद पत्रांसाठी कोंढाळा ग्रामपंचायत कार्यालयात सकाळ पासून ते सायंकाळपर्यंत दिसून येत आहे.अशातच काल, मंगळवारी कार्यालयातील कर्मचारी कामात व्यस्त असतांना टेबलावर ठेवलेला ग्रामपंचायतीचा अँड्रॉइड मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.सदर मोबाईल हा मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात खरेदी करण्यात आला होता.एखादा प्रमाणपत्र काढण्यासाठी मोबाईलवर ओटीपी जात असतो. त्यामध्ये ग्रामपंचायतीची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली असून इतरांना त्याचा काहीही उपयोग होणार नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या सायबर सेलकडे याबाबत तक्रार गेली असल्याने ‘तो’ मोबाईल चोरटा कोण? हे लवकरच कळणार आहे.ज्या व्यक्तीने मोबाईल चोरून नेला असेल,त्यांनी कोंढाळा ग्रामपंचायत कार्यालयात आणून देण्याचे करावे; अन्यथा ग्रामपंचायत आवारातील लावण्यात आलेल्या सिसीटिव्ही कॅमेरा च्या माध्यमातून शोध घेऊन संबंधित चोरट्याला जेलची हवा खावी लागेल; अशी माहिती ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत यांनी दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एकलव्य व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा,विज्ञान व कला क्षेत्रात करणार मॅपिंग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या क्रीडा,विज्ञान तसेच कला व संस्कृती...

कर्जफेडीसाठी दिलेला चेक बाऊन्स; दोषीला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-एका बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी दुसऱ्या बँकेचा चेक दिला खरी, पण जो चेक देण्यात आला,त्या बँकेच्या खात्यात पुरेसे पैसेच...

३० वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा परिसराच्या वेणा नदीत बुडून एका ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे,नदीतील...

अवैध तंबाखू साठवणूक व विक्री करणाऱ्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रात गुटखा,पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूवर राज्य शासनाने १९ जुलै २०१२ पासून सक्तीची बंदी लादली; मात्र गेल्या १४ वर्षांत ही बंदी कागदोपत्रीच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!