Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली येथील समाज कल्याण विभागाचे कार्यालय तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात यावे-दिव्यांग बांधवांची मागणी…

गडचिरोली येथील समाज कल्याण विभागाचे कार्यालय तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात यावे-दिव्यांग बांधवांची मागणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली येथील समाज कल्याण विभाग जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर असुन या विभाग अंतर्गत दिव्यांगांच्या सोई सवलती सल्ला,मार्गदर्शन,तक्रार निवारण इत्यादी कामे केल्या जातात. या करीता दिव्यांगांना दुसऱ्या मजल्यावर चढण्या करीता शारीरिक मानसिक त्रास होत असते.त्यामुळे दिव्यांगांच्या अंतरभावना दुखावत असल्याने समाज कल्याण विभागाचे कार्यालय तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात यावे; अशी मागणी दिव्यांग बांधवांतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण २०१८ अंतर्गत प्रकरण ७ नुसार दिव्यांग व्यक्तीला अडथळा विरहित मुक्त संचार व्यवस्था करण्याचे निर्देर्शीत आहेत.त्या अंतर्गत समाज कल्याण अधिकारी यांनी कार्यवाही करण्यास पाहिजे होती.परंतु समाज कल्याण अधिकारी  व या संबंधित कर्मचाऱ्यानी डोळे मिटुन मुके बहिरे होऊन दिव्यांगांचे शोषण करीत आहेत.‘समाज कल्याण अधिकारी व संबंधित कर्मचारी कायद्याचे रक्षक की कायद्याचे भक्षक’ असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पंचायत समिती गडचिरोली येथील सभागृहात व त्यालाच लागुन असलेल्या ऑफीसमध्ये दिव्यांगाकरीता सुसज्ज अशी रॅम्प रेलींग उरड हात पकडण्यासाठी दंड लावलेली नाही.अनेकवेळा सदरची बाब दिव्यांगांनी संवर्ग विकास अधिकारी यांचे निदर्शनास आणुन दिली.मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अजुन पर्यंत व्यवस्था करण्यात आली नाही.अशा प्रकारे जिल्हयातील अनेक विभागाची अशीच स्थिती आहे.तरी जिल्हयातील सर्वे करून दिव्यांगांकरीता रेलींगची व्यवस्था करण्यात यावी व गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग यांचा सदभावनेने विचार करून समाज कल्याण विभाग जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावर (रोजगार ऑफिसमध्ये) विना विलंब स्थलांतरीत करून दिव्यांगांना शारीरिक व मानसिक त्रासापासुन मुक्त करावे; अशी मागणी दिव्यांग विषयक आरोग्य व शिक्षण विभागाचे माजी सदस्य मुकुंदराव उंदिरवाडे,रविंद्र रंगु,शेषराव धकाते, पि.डब्ल्यु.गेडाम यांनी जिल्हा परिषद गडचिरोलीचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी शेलार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी संजय दैने यांना निवेदनातुन करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!