Tuesday, July 14, 2026
Homeदेसाईगंजसावंगी येथील मोफत आरोग्य शिबिरात हजारोंच्या वर रुग्णांनी घेतला लाभ… - रामदास मसराम व...

सावंगी येथील मोफत आरोग्य शिबिरात हजारोंच्या वर रुग्णांनी घेतला लाभ… – रामदास मसराम व मित्र परिवार यांचा पुढाकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील मौजा- सावंगी येथे कॉंग्रेसचे नेते रामदास मसराम व मित्र परिवाराने दिनांक- २२ जून ला आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात तब्बल १३४६ रुग्णांनी लाभ घेतला आहे.                            सावंगी,गांधीनगर,आमगाव,नविन लाडज या भागात वास्तव्यात असलेले बहुतांश नागरिक शेतकरी आहेत. सध्या शेती मशागतिचे दिवस सुरु आहेत.अशातच गोरगरिब लोकांना आरोग्याची समस्या उद्भवु नये; यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव प्रयत्नशिल असणारे शेतकरी आंदोलनाचे प्रणेते रामदास मसराम यांनी सावंगी येथे मोफत  आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले होते.

सदर शिबिरात ७४० रुग्णांची नेत्र तपासणी करुण त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.तर ४६६ रुग्णांची मधुमेह तपासणी करुन त्यांना औषधोपचार पुरविण्यात आला.ह्रदय रोगाच्या रुग्णांची तपासणी करुन १२ रुग्णांना मोफत औषधोपचार तथा पुढिल आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याचे मार्गदर्शन तसेच १५ मोती बिंदु रुग्णांची तपासणी करुन त्यांच्या शस्त्रक्रियेच्या पुढील व्यवस्थेचे मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले.या प्रसंगी कॉंग्रेसचे पदाधिकारी पंकज चहांदे यांचेसह १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.आरोग्य शिबिराचे आयोजक रामदास मसराम यांचेसह माजी पं.स.सभापती परसराम टिकले.माजी उपसभापती नितिन राऊत,कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजुभाऊ रासेकर,सावंगीचे उपसरपंच सुमंत मेश्राम,ग्रा.पं. सदस्य राजु कुरेशी,रजनिकांत गुरनुले,मोतिराम दिवठे, मोतिराम उईके,आरती लहरी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सागर वाढई,शैलेश येलगंधवार,गौरव शिलार,स्वप्निल मिसार,मोरेश्वर मोहुर्ले,पंकज चहांदे,दुष्यंत वाटगुरे,प्रमोद पत्रे,लता धांडे,जावेद शेख,संगिता दुफारे,देवेन्द्र बन्सोड,रचना बन्सोड,प्रा.अश्फाक सैय्यद,लंकेश ढोरे,ब्रम्हदास गुरनुले,भुषन ठाकरे,भरत ठाकरे यांचेसह युवा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.या आरोग्य शिबिराला नागपुरच्या सुप्रसिद्ध असलेल्या श्युअरटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटच्या तज्ञ डॉक्टरांच्या चमुसह जिल्हा रुग्णालय गडचिरोलीचे तज्ञ डॉक्टर,कर्मचारी वृंद तसेच देसाईगंज ग्रामिण रुग्णालयाचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा प्रदान केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!