Saturday, June 13, 2026
Homeकोंढाळावेल सेटल्डच्या अपेक्षेने मुलांना फुटतो आहे घाम; लग्नासाठी मुलीच्या शोधात वणवण…

वेल सेटल्डच्या अपेक्षेने मुलांना फुटतो आहे घाम; लग्नासाठी मुलीच्या शोधात वणवण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोंढाळा (गडचिरोली) :-लग्नाच्या बाबतीत दिवसेंदिवस मुलींच्या अपेक्षा वाढतच आहेत.वेल सेटल्ड हवा,या अपेक्षेने तर मुलांना घाम फुटत आहे.हल्ली मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे.स्वभाव,कुटुंब व अनुरूपता न पाहता शेती,नोकरी,पगार,गाडी, स्वतःचे घर आणि कुटुंबातील कमी सदस्यसंख्या यावरच हल्ली लग्न ठरत आहेत. 

मुली सरकारी नोकरी करणाऱ्या मुलांना प्राधान्य देत आहेत.सरकारी नोकरी करणारा नवराच बरा, असे या मुलींना वाटतेय.आज ज्या मुलांकडे सरकारी नोकरी आहे; अशा मुलांना मोठी मागणी आहे.पूर्वी ज्याप्रमाणे सेफ नोकरी म्हणून बघितले जायचे,तशीच परिस्थिती आता पुन्हा निर्माण झाली आहे.

मुलगा शेतकरी असला तरी चालेल; पण भरपूर शेती तसेच कुठला तरी व्यवसाय तसेच जोड धंदा असावा, अशी अपेक्षा कमी शिकलेल्या ग्रामीण भागातील मुलींकडून केली जात आहे.यामुळे ज्यांची शेती कमी व तीही कोरडवाहू अशा मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!