Wednesday, June 24, 2026
Homeगोंदियाप्रॉपर्टी डिलरवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला…-पुन्हा गोंदिया शहरातील गुन्हेगारी आणि गँगवार आले...

प्रॉपर्टी डिलरवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला…-पुन्हा गोंदिया शहरातील गुन्हेगारी आणि गँगवार आले उफाळून…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- अलीकडे गोंदिया पोलिस गुन्हेगार प्रवृत्तींच्या मुसक्या आवळण्यासाठी ॲक्शन मोडवर असले तरी गुन्हेगारांवर पोलिसांचे वचक राहिले नाही. अशीच परिस्थिती एका मागे एक घडत असलेल्या गैंगवारच्या घटनेवरून समोर येऊ लागली आहे. पंधरवड्यापूर्वीच छोटा गोंदिया येथे क्षुल्लक कारणावरून एका युवकाची हत्या करण्यात आली होती.या घटनेची शाई सुकली नाही की,त्याच परिसरातील राजाभोज चौक येथे दिवसाढवळ्या सकाळी ९.४५ सुमारास एका प्रॉपर्टी डिलरवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला.

प्राणघातक हल्ल्याचा थरार अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवला.याघटनेत जखमी प्रॉपर्टी डिलर महेशदखने हा अत्यवस्थेत असून अतिदक्षता कक्षात उपचार घेत आहे.या घटनेमुळे पुन्हा गोंदिया पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

छोटा गोंदिया येथील महेश दखने वय ३५ वर्षे हा युवक प्रॉपर्टी डिलरचा काम करतो.काल,दिनांक-९ जून रोजी सकाळी ९.४५ वाजता महेश दखने हा दुचाकी क्र.एमएच ३५/एवी-९५५० ने घरून बाहेर पडला.राजाभोज चौकातील जान्हवी ऑटो रिपेयरिंग सेंटर जवळ महेश दखने याच्यावर पाळत ठेवलेल्या आरोपींनी त्याचा घेराव केला.दरम्यान धारदार शस्त्र, दगड,कुन्हाड आदि शस्त्राने त्याच्यावर सपासप वार करणे सुरू केले.या घटनेत महेश दखने हा रक्ताच्या थारोळ्यात आरडाओरड करीत खाली पडला.भर चौकात दिवसाढवळ्या सुरू असलेला प्राणघातक हल्ल्याचा थरार परिसरातील अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवला.दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महेश दखणे याचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढले; जखमी महेश याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.जखमी महेश याचे रक्त वाहून गेल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.या घटनेमुळे पुन्हा गोंदिया शहरातील गुन्हेगारी आणि गँगवार उफाळून आल्याची चर्चा सुरू झाली आहे.गोंदिया पोलिस कितीही ॲक्शन मोडवर असले तरी गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक पोलिसांना जुमानत नसल्याचेही परिचय देवू लागले आहे.या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!