Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीप्रधानमंत्री सुरक्षा विमा; आता वार्षिक २० रुपयांत दोन लाखांचा विमा…-कोणत्याही एकाच बँकेतून...

प्रधानमंत्री सुरक्षा विमा; आता वार्षिक २० रुपयांत दोन लाखांचा विमा…-कोणत्याही एकाच बँकेतून विमा योजनेसाठी करता येणार अर्ज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-केंद्र शासनाच्या वतीने २०१५ पासून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबविली जात आहे.त्याअंतर्गत वार्षिक २० रुपयांत दोन लाखांचा विमा दिला जातो.प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँकांकडून या योजनेसाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो.प्रति दिवसासाठी केवळ पाच पैसे अशा दराने विमा खर्च होत असल्याने सर्वसामान्यांसाठी ही योजना लाभदायक ठरत आहे.

२० रुपयांत दोन २ लाखांचा विमा👇

जेव्हा ही पीएम सुरक्षा योजना सुरू केली होती तेव्हा वार्षिक १२ रुपये प्रीमियम घेतला जात होता.त्यात आता वाढ झाली असून,या योजनेसाठी वार्षिक २० रुपये प्रिमियम घेतला जात आहे.या योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास विमाधारकास दोन लाखांचा विमा मिळतो. लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे.

एकावेळीच विमा👇

एकाच व्यक्तीचे चार-पाच बचत बैंक खाते असते. त्यामुळे पीएम सुरक्षा विमा योजनेसाठी कोणत्याही एकाच बँकेतून विमा योजनेसाठी अर्ज करता येतो. १८ ते ७० वय असणारे नागरिक या विमा योजनेसाठी पात्र ठरतील.

अटी काय ?👇

हा विमा प्रत्येक राष्ट्रीय बँकेकडून काढला जाऊ शकतो.विमा काढण्यासाठी संबंधित बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

१ जून ते ३१ मे असा विमा योजनेचा कालावधी असतो.ऑफलाइन किंवा ऑनलाइन विमा काढता येतो.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ९ मे २०१५ रोजी सुरू करण्यात आली.जे नागरिक विम्याच्या कक्षेत आले नाहीत त्यांना विमा मिळावा; यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.सर्वसामान्य व गोरगरीब लोकांचा या योजनेत समावेश करून घेण्यासाठीचा प्रयत्न केंद्र शासनाकडून केला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!