Sunday, August 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपैसे द्या; अन् शिक्षक व्हा..! खासगी शाळा संस्थांच्या पद भरतीचे नवे रेट...

पैसे द्या; अन् शिक्षक व्हा..! खासगी शाळा संस्थांच्या पद भरतीचे नवे रेट कार्ड जाहीर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- शिक्षण क्षेत्राला पवित्र क्षेत्र असे संबोधले जाते.मात्र या क्षेत्रालादेखील आता भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे.पूर्वी सेवा म्हणून ज्ञानदानाच्या कामाकडे बघितले जात होते.अलिकडे मात्र शिक्षण क्षेत्रासारखी सुखाची नोकरी नाही; असा समज झाला आहे.त्यामुळे आता शिक्षकांच्या पदासाठी लाखो रुपयांची रक्कम संस्थांना मोजावी लागत आहे.खासगी शाळा संस्थांनी पद भरतीचे नवे रेट कार्ड जाहीर केले आहे.त्यात शिक्षक पदाकरिता ३०,तर प्राध्यापक पदासाठी तब्बल ६० लाख रुपयांपर्यंतचे दर ठरविले आहेत.त्यामुळे गुणवत्ता असूनही गरीब पदवी आणि पदत्युत्तर उमेदवारांना शिक्षकाची नोकरी पदरी पाडून घेता येत नसल्याचे वास्तव आहे.शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची मालिका केवळ कार्यालयातच सुरू असते असे नाही तर शैक्षणिक संस्थांच्या स्तरावरही मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होते.विशेषतः शिक्षक, प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीत मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याचे दिसते.ज्ञानगंगेच्या पवित्र कार्यात भ्रष्टाचाराचीही गंगाजळी वाहू लागली आहे.त्याचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसत आहे.अशा वशिलेबाज शिक्षकांमध्ये पात्रताच नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही त्याचा परिणाम होत आहे.याला काही संस्थाचालक अपवाद आहेत. मात्र त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आधुनिक भारताच्या निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या महत्पुरुषांच्या विचारांना तिलांजली देऊन शैक्षणिक दुकानदारी व्यवस्थेला प्रोत्साहन देणारे सरकारी धोरण जनकल्याणाचा गळा घोटणारे ठरत आहे.

अनेकांचे रेट कार्ड ठरलेले आहेत; ते पुढीलप्रमाणे👇

प्राथमिक शिक्षक १५ ते २० लाख

माध्यमिक शिक्षक २५ ते ३० लाख 

महाविद्यालयीन प्राध्यापक ४५ ते ५० लाख 

सिनिअर कॉलेज प्राध्यापक ६० लाखांपुढे 

वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी ५० हजार 

मुख्याध्यापक पदोन्नती १ लाखांपर्यंत

पेन्शन प्रकरण १ ते २ लाख किंवा शेवटचे वेतन 

संस्थांतर्गत बदली ५० हजार ते १ लाख

मुख्याध्यापक बदली २ लाख 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!