Thursday, September 24, 2026
Homeगडचिरोलीविदर्भासह पुढील चार दिवस गडचिरोली जिल्ह्यात पडणार पाऊस..

विदर्भासह पुढील चार दिवस गडचिरोली जिल्ह्यात पडणार पाऊस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील काही भागात दोन दिवसांपूर्वी वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली होती.या वादळी पावसामुळे चामोर्शी तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली होती.तर वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यूही ओढावला.मान्सूनपूर्व पावसाची ही झलक असल्याचे जिल्हावासीयांनी अनुभवले.मात्र दोन दिवसानंतर पुन्हा वातावरणात बदल होऊन पुन्हा उकाडा वाढला.यामुळे गरमीने नागरिकांची लाहीलाही झाली.अशातच हवामान विभागाने विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात ठिकठिकाणी ९ जून ते १२ जुनपर्यंत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारा सुटण्याची शक्यता वर्तविली आहे.हवामान विभागाच्या या शक्यतेमुळे जिल्हावासीयांची पुन्हा तारांबळ उडाली आहे.तर शेतकऱ्यांना मात्र मान्सूनची चाहूल लागल्याने आनंद व्यक्त केला आहे.पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पुन्हा एकदा शेतीच्या कामात व्यस्त होण्याची चिन्हे आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!