Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीओबीसी प्रवर्गातील युवक-युवतींसाठी विविध योजना..-थेट कर्ज योजना,वैय्यक्तीक कर्ज योजना,शैक्षणिक कर्ज योजना व...

ओबीसी प्रवर्गातील युवक-युवतींसाठी विविध योजना..-थेट कर्ज योजना,वैय्यक्तीक कर्ज योजना,शैक्षणिक कर्ज योजना व इतर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत ओबीसी प्रवर्गातील युवक युवतींसाठी विविध योजना उपलब्ध आहेत.या योजनेचा युवक-युवतींनी लाभ घ्यावा; असे आवाहन गडचिरोली जिल्हा व्यवस्थापक‍ किशोर सातपूते यांनी केले आहे.

थेट कर्ज योजना १ लाखापर्यंत👇

या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.)प्रवर्गासाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता,लघु उदयोग सुरु करण्यासाठी १ लाखाची बिन व्याजी थेट कर्ज योजना सुरु केली आहे.सदर योजनेत नियमित परतफेड न करणा-या लाभार्थींना द.सा.द.से ४ टक्के व्याज आकारण्यात येणार आहे.व कर्ज परतफेडीची मुदत ४ वर्ष असणार आहे.

२०% बिजभांडवल योजना ५ लाखापर्यंत👇

या योजनेंतर्गत कमाल मर्यादा रु.५ लाखा पर्यंतचे प्रकल्पास मंजुरी देण्यात येतेकृषी व संलग्न व्यवसाय, वाहतुक क्षेत्राशी संबधीत व्यवसाय तसेच पारंपारीक, लघु व सेवा उद्योगासाठी कर्ज देण्यात येते. नावीन्यपुर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येणार आहे.मंजुर कर्ज रक्कमेच्या ५ टक्के लाभार्थी,२० टक्के महामंडळ व ७५ टक्के बँकेचा सहभाग आहे.महामंडळाच्या कर्ज रक्कमेवर ६ टक्के व्याज दर असुन बँकेच्या कर्ज रक्कमेवर बँकेचा व्याज दर लागु राहील.कर्जाची परतफेड ५ वर्षात करायची आहे. 

वैय्यक्तीक कर्ज व्याज परतावा योजना १० लाखापर्यंत👇

या योजनेचे स्वरुप बँकेने रु.१० लाख पर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजुर केलेल्या अर्जदाराने वेळेत कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यानंतर व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.सदर योजना संपुर्णपणे संगणकीकृत आहे.कर्ज परतफेडीचा कालावधी बँक निकषानुसार आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना १० ते ५० लाखापर्यंत

या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महामंडळाच्या निकषानुसार विहीत केलेल्या वार्षीक उत्पन्न मर्यादेतील उमेदवाराच्या बचत गट,भागीदारी संस्था,सहकारी संस्था,(कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत),(LLP,FPO)अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थाना बँके तर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल,त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडुन अदा केला जाईल.या योजनेचे स्वरुप पुढील प्रमाणे आहे.नॉन क्रिमीलेअर करीता असलेल्या कौटुंबीक वार्षीक उत्पन्न मर्यादेत असलेल्या उमेदवारांच्या गटांकरीता असणार आहे.बँकेकडुन प्रत्येक गटात कमीत कमी रुपये १० लक्ष ते जास्तीत जास्त रुपये ५० लक्षपर्यंतच्या मंजुर उद्योग उभारणी करीता आहे.मंजुर कर्जावर ५ वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल ते कर्ज मंजुर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्त्ता भरल्यावर जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराच्या आणि रुपये १५ लाखाच्या मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसुल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल.इतर कोणतेही शुल्क, देयके अदा करणार नाही.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना १० ते २० लाखापर्यंत👇

सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येते.इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु.१० लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु.२० लक्ष इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल.विद्यार्थीचे वय १७ ते ३० वर्षे असावे व तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.अर्जदाराचे कौटुंबीक वार्षीक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता रु.८ लक्ष पर्यंत असावे. अर्जदार १२ वी ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

देशांतर्गत अभ्यासक्रम :- १)आरोग्य विज्ञान, २) अभियांत्रीकी,३) व्यावसायीक व व्यवस्थापन,४) कृषी अन्नप्रक्रीया व पशुविज्ञान 

परदेशी अभ्यासक्रम :- १)आरोग्य विज्ञान, २) अभियांत्रीकी,३) व्यावसायीक व व्यवस्थापन,४) विज्ञान ५) कला, बँकेने उपलब्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क पुस्तके व साहीत्य खरेदीचा समावेश राहील परदेशी अभ्यासक्रमासाठी QS च्या रॅकींग २०० च्या आतील व GRE,TOEFL परिक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

इच्छुक उमेदवारांनी योजनेसंदर्भात www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन,आय.टी.आय.मागे गडचिरोली येथे संपर्क साधावा; असे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!