Friday, June 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनशीब बलवत्तर…! 'त्या' दोघांनी तुरुंगातूनच जिंकली लोकसभा निवडणूक...

नशीब बलवत्तर…! ‘त्या’ दोघांनी तुरुंगातूनच जिंकली लोकसभा निवडणूक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये काही जागांवर अतिशय धक्कादायक निकाल समोर आले आहेत. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला आहे.अनेकांचे नशीब केव्हा फळफळतील हे सांगता येत नाही.असाच प्रकार लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसून आला आहे.दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले दोन उमेदवार निवडणुकीत विजयी झालेले आहेत.त्यामुळे असामान्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे आता त्यांना मंत्रिपदाची शपथ घेता येईल का? ते संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहू शकतील का? असा प्रश्न अनेकांना पडतो आहे. कायद्यानुसार त्यांना नवीन सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी नसली तरी त्यांना खासदार म्हणून शपथ घेण्याचा घटनात्मक अधिकार आहे.खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग यांनी पंजाबच्या खदूर साहिब जागेवर विजय मिळवला आहे.तर दहशतवादासाठी निधी पुरवल्याचा आरोप असलेला अब्दुल रशीद शेख विजयी झाले आहेत.अब्दुल रशीद शेख दहशतवादाला आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली ९ ऑगस्ट २०१९ पासून तिहार तुरुंगात आहेत. अमृतपाल सिंगला एप्रिल २०२३ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. त्यांना आसाममधील दिब्रुगड तुरुंगात पाठवण्यात आले होते.आता प्रश्न असा पडतोय की,तुरुंगा असलेल्या या निवडून आलेल्या खासदारांना शपथ घेता येणार का?

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर तुरुंगात असलेल्या खासदारांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची प्रक्रिया काय असते? असा प्रश्न सर्वांना पडत आहे.कायदेशीररित्या,अमृतपाल सिंग आणि अब्दुल रशीद शेख यांना १८ व्या लोकसभेच्या कामकाजात उपस्थित राहण्यास मनाई आहे; तरीही त्यांना संसद सदस्य म्हणून शपथ घेण्याचा घटनात्मक अधिकार कायम आहे; असे पीटीआयच्या म्हणजेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले असल्याची माहिती इंडिया टाईम्सच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!