उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोली च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता ” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे बाविसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २६ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात नाशिक जिल्ह्यातील कवयित्री सौ.माधुरी अमृतकार यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “मुर्ती वात्सल्याची” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
सौ.माधुरी नामदेव अमृतकार या मौजा-सटाणा (ता.त्र्यंबकेश्वर, जिल्हा- नाशिक) येथील रहिवासी असून प्रसिद्ध कवयित्री आहेत.पाचशे च्या जवळपास कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे.अनेक वृत्तपत्रांतून त्याच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत.व्हॉट्सॲप गृपवरुन सुरू असलेले त्यांचे ‘स्वरचित मधुर वाणी’ हे सदर विशेष लोकप्रिय असून जवळपास १२००चा टप्पा या सदराने पार केलेला आहे.त्यांना अनेक ऑनलाईन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या बाविसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने नरेंद्र गुंडेली, वंदना सोरते,माधुरी अमृतकर,गजानन गेडाम,कृष्णा कुंभारे,जयराम धोंगडे,रोशन येमुलवार,भिमानंद मेश्राम,अंगुलीमाल उराडे,सुरज गोरंतवार,गणेश रामदास निकम,मिलींद बी.खोब्रागडे,अजय राऊत, तुळशीराम उंदीरवाडे,पुनाजी कोटरंगे,प्रभाकर दुर्गे, मधुकर दुफारे,पुरुषोत्तम दहिकर,विलास जेंगठे, संतोष कपाले,डॉ.मंदा पडवेकर,मुरलीधर खोटेले, अनुराग मुळे,रेखा दिक्षित,सुनील मंगर,सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
– चुडाराम बल्हारपुरे(नाटककार)

