Wednesday, August 26, 2026
Homeगडचिरोलीआरमोरी,चामोर्शी तालुक्यात हत्तीरोग दुरीकरण औषधोपचार मोहिम - १० फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी कालावधीत...

आरमोरी,चामोर्शी तालुक्यात हत्तीरोग दुरीकरण औषधोपचार मोहिम – १० फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी कालावधीत राबविणार मोहीम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त                       

गडचिरोली :- राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिम (एमडीए/आयडीए) दिनांक १० फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२३ कालावधीमध्ये राबविणेबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त झालय असून त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हयात चामोर्शी व आरमोरी या दोन्ही तालुक्यात सदर मोहिम राबविण्यात येणार आहे.यासाठी जिल्हाधिकारी, संजय मीणा यांचे मार्गदर्शना खालील हत्तीरोग दुरीकरण औषधोपचार (एमडीए/आयडीए) मोहिम जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालय येथे २३ जानेवारी २०२३ रोजी घेण्यात आली. 

सभेस मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद,  जिल्हयातील सर्व विभाग प्रमुख तसेच सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप), नागपूर डॉ.श्याम निमगडे,जागतिक आरोग्य संघटना, सल्लागार नागपूर, विभाग, डॉ.भाग्यश्री त्रिवेदी, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

हत्तीरोग हा क्युलेक्स डासापासून होणारा संक्रमक आजार असून हा आजार हत्तीरोग (फायलेरीया) या नावाने ओळखला जातो. क्युलेक्स डासाची उत्पत्ती घाण पाण्यात , गटारे, सांडपाणी यामध्ये मोठया प्रमाणात होते.दुषित डास मनुष्याला चावतो व त्वचेवर हत्तीरोगाचे जंतू सोडतो हे जंतू त्वचेतून शरिरात प्रवेश करतात व लसिकाग्रंथी मध्ये स्थिरावतात.जंतूचा शरीरातील प्रवेश आणि आजाराची लक्षणे दिसण्याचा कालावधी हा ८ ते १६ महिन्यांचा असतो.सदर कालावधित रक्ताची तपासणी केली नाही व औषधोपचार केला नाही तर शरीरात जंतूची वाढ होवून हाता पायावर सुज येणे व अंडवृध्दी होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.हत्तीरोगाचे जंतू हे मानवी रक्तात मोठया प्रमाणात दिसून येतात त्यामुळे रात्री ८ ते १२ वाजताच्या दरम्यान रक्तनमुना घेऊन तपासणी केल्यानंतर हत्तीरोगाचे निदान करता येते.

हत्तीरोग हा गडचिरोली जिल्हयातील गंभीर आरोग्य समस्या आहे. या रोगामुळे शारीरीक विकृती,अंपगत्व असे गंभीर परिणाम होतात.यासाठी शासनाने हत्तीरोग दुरीकरण मोहिमेतंर्गत तीन औंषधाची (आयडीए) उंची व वयोगटानूसार एक मात्रा घेऊन या रोगाचा समुळ नाश करता येतो.हत्तीरोगाचे तीनही औषधी प्रत्येक घरात आरोग्य कर्मचाऱ्याद्वारे मोफत देण्यात येतील ही औषधी रिकाम्या पोटी घेऊ नये तसेच अलबेंन्डाझोल ही गोळी चावून चावून खावी. औषधी देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसमोरच गोळया खाणे आवश्यक आहे.दोन वर्षापेक्षा कमी वयाची मुले व गरोदर माता तसेच गंभीर रुग्णांना ही औषधी दिली जाणार नाही.

सार्वत्रिक औषधोपचार मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत लोकसहभाग वाढविण्या संदर्भात जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आरोग्य विभागाला सुचना दिल्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६(Special Intensive Revision-SIR)कार्यक्रमात सुधारणा केली असून,सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,येत्या ३१ ऑगस्ट २०२६...

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!