Thursday, August 13, 2026
Homeपुणेयेत्या ३ जून ला मिळणार बारावीच्या गुणपत्रिका..

येत्या ३ जून ला मिळणार बारावीच्या गुणपत्रिका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पुणे :- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या गुणपत्रिकांचे सोमवारी दिनांक- ३ जून रोजी वाटप करण्यात येणार आहे.२१ मे रोजी बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला होता.विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये दुपारी तीन वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या गुणपत्रिका,स्थलांतर प्रमाणपत्र व तपशिलवार गुण दर्शविणारे कनिष्ठ महाविद्यालयीन अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांमार्फत उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवारी दिनांक- ३ जून रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याच दिवशी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे व स्थलांतर प्रमाणपत्रांचे वाटप करायचे आहे.त्यानुसार विभागीय मंडळस्तरावर नियोजन करावे; असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुचाकीची पीकअपला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू.. – देसाईगंजच्या कुरुड फाट्यावरील आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड फाटा बसस्थानक नजीक दुचाकीची समोरून येणाऱ्या पीकअपला जोरदार धडक बसल्याने घडलेल्या अपघातात २० वर्षीय...

परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम; गडचिरोलीतील स्टील हब व कौशल्य विकासाला चालना- उद्योगमंत्री उदय सामंत – ३६ हजार २११ कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याच्या...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याचे तसेच राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याचे आरोप चुकीचे आहेत. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर...

राज्य शासनाकडून स्वतंत्र ‘गडचिरोली प्रदेश’ घोषित.. – मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण,वाढत्या पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने संपूर्ण गडचिरोली महसुली जिल्ह्याचा समावेश असलेला...

आजपासून श्रावण महिन्यास सुरुवात; श्रावणात असणार चार सोमवार..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.हा संपूर्ण महिना व्रतवैकल्य,धार्मिक विधी, भगवान शंकराची भक्ती,पूजा आणि उपवासासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!