Friday, October 16, 2026
Homeनागपूरबुद्धपौर्णिमेच्या दिवशीच कां केली जाते प्राणीगणना?

बुद्धपौर्णिमेच्या दिवशीच कां केली जाते प्राणीगणना?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- बुद्धपौर्णिमा आणि पाणवठ्यावरील निसर्ग अनुभव कार्यक्रम हे एक वेगळे समीकरण झाले आहे. बुद्धपौर्णिमेची रात्र वर्षातील सर्वाधिक लख्ख प्रकाशाची रात्र समजल्या जाते.त्यामुळे यादिवशी महाराष्ट्र वन विभागाकडून वन्यप्राण्यांची नोंद करण्यात येते.या उपक्रमाचा प्रारंभ बुधवारी, २२ मे रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आले.पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत ३७, उमरेड करांडला व्याघ्र प्रकल्पांतर्गत ३४ आणि बोर (वर्धा) व्याघ्र प्रकल्पांतर्गत ३५ मचाणांची व्यवस्था या उपक्रमासाठी करण्यात आली आहे.

वन्यजीव प्रेमींसाठी हा संपूर्ण अनुभव थरारक आणि अतिशय उत्सुकतेचा असल्याने हे क्षण अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज वन विभागाला प्राप्त होतात.त्याची छाननी करून त्यानंतर काही अर्जावर शिक्कामोर्तब करण्यात येते.त्यानंतर एका मचाणावर एक निसर्गप्रेमी आणि वन्य रक्षकाची नेमणूक होते.विशेष म्हणजे पेंचसह उमरेड करांडला, पवनी आणि बोरच्या सर्वच वनपरिक्षेत्रात जय्यत तयारी करण्यात येत आहे.खास मचाणांची व्यवस्था करण्यात येते.पाणवठ्याजवळ उभारण्यात आलेल्या मचाणावरून रात्रीच्या अंधारात पाणी पिण्यास येणाऱ्या वन्यप्राण्यांची नोंद करण्यात येते.

प्राणिगणना उन्हाळ्यातच करण्याचे मुख्य कारण म्हणजे,या काळात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटतात आणि पाण्याचा तुटवडा भासतो.अशावेळी जंगलातील बहुतेक प्राणी पाणवठ्यावर येतात.त्यामुळे वन्यजीव प्रेमी आणि वन कर्मचारी दुपारपासून मचाणांवर मुक्काम करतात.रात्री पाण्यासाठी पाणवठ्यावर प्राणी आले की त्यांच्या नोंदी घेतल्या जातात.

नासाची मिल्कमूनची व्याख्या अशी आहे👇

बौद्धपौर्णिमेचा चंद सर्वात प्रकाशमय चंद्र म्हणून ओळखण्यात येतो.अंतराळ संस्था नासाने यादिवशीच्या चंद्राची व्याख्या कॉर्नमून किंवा मिल्कमून म्हणूनही केली आहे.यंदाचा चंद्र सुमारे तीस टक्के अधिक चमकणार असल्याचे नासाकडून सांगण्यात आले आहे.अशा बौद्धपौर्णिमेच्या रात्री वन विभागाने निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!