उद्रेक न्युज वृत्त :- महाराष्ट्राच्या हवामानात विचित्र बदल पहायला मिळणार आहेत.येत्या चार पाच दिवसात वातावरणात कमालीचे बदल पहायला मिळणार आहेत.राज्यात अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट वातारवरण राहणार आहे.तर,राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वार वाहणार आहे.तसेच अनेक ठिकाणी तुफान पाऊस पडणार आहे. हवामान खात्यातर्फे पावासासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे.मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मराठवाड्यातील एक,दोन जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह पाऊस पडणार आहे. तर, काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
महाष्ट्राच्या हवामानात होणार बदल; काही ठिकाणी वादळ,वारा तर काही ठिकाणी उष्ण-दमट वातावरण..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

