उद्रेक न्युज वृत
अहेरी(गडचिरोली) :- भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओ वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पोलिस जवान ठार झाल्याची घटना काल, मंगळवारी दिनांक -९ रोजी दुपारच्या सुमारास अहेरी-महागाव मार्गावर घडली.चिन्ना जोगा विडपी वय ४० वर्षे रा.लष्कर ता.भामरागड (ह.मु. अहेरी), असे मृतक पोलिस जवानाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी वाहन चालक स्वप्निल यशंवंत दिवटे वय २९ वर्षे रा. वाकडी (ह.मु.डोंगरगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे.चिन्ना विडपी हे सी-६० जवानांचे माजी कमांडर असू न सद्यस्थितीत अहेरी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.दरम्यान ते आपल्या दुचाकीने अहेरी येथून वांगेपल्लीकडे जात होते.दरम्यान अहेरी-महागाव मार्गावर एम.एच.३२ एएच ४०५३ क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनाने भरधाव वेगात येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.यात त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती प्राप्त होताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला.त्यांची पत्नी यांच्या तक्रारीवरुन आरोपी चारचाकी वाहन चालक स्वप्निल दिवटे याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जनार्धन काळे यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

