उद्रेक न्युज वृत्त
संपादक/मुनिश्वर बोरकर
गडचिरोली :- ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी; ह्या प्रमुख मागण्या सहीत इतरही मागण्या घेऊन ओबीसी बांधवांनी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक येथे ४ मार्च पासुन साखळी उपोषण सुरू केला आहे.
आज उपोषणाचा तीसरा दिवस आहे.यावेळी ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर,प्रसिध्दी प्रमुख पंकज खोबे,पदम भुरसे,ओबीसी नेते प्रा.शेषराव येलेकर,सुनिल चडगुलवार,दत्तु खरवडे,सुरेश भांडेकर,प्रा.राजेंद्र हिवरकर,खेमदेव चापले,पद्माकर धुडसे,मनोज पिपरे,राहुल भांडेकर,अभिषेक चौधरी , देवेंद्र कोठारे,अनुप कोहळे,संजय चलेवार आदि सहीत बहुसख्य ओबिसी बांधव व युवा वर्ग प्रामुख्याने साखळी उपोषणाला बसले आहेत.बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करावी,मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, ओबीसी विद्यार्थासाठी मंजुर केलेले वस्तीगृह तात्काळ सुरु करावे,जिल्ह्यात नव्या २०० बसेस देण्यात याव्यात, सुरजागड व कोनसरी प्रकल्पात स्थानिकांना नोकरीत प्राध्यान देण्यात यावेत,सरकारी नोकऱ्यातील कांत्राटीकरण बंद करावे,महाज्योतीला दरवर्षी १ कोटी अनुदान देण्यात यावेत आदि विविध मागण्या घेऊन ओबीसी बांधवांनी साखळी उपोषण सुरू केला आहे.

