Friday, September 25, 2026
Homeगडचिरोलीसाहेब पिके कशी जगवायची; विद्युत वितरण कंपनी शेतकरी बांधवांच्या जीवावर उठले की...

साहेब पिके कशी जगवायची; विद्युत वितरण कंपनी शेतकरी बांधवांच्या जीवावर उठले की काय?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- शेतकरी बांधवांच्या पदरी नेहमी निराशाच पडलेली दिसून येत आहे.यांचा वाली कुणीही नसल्याने केवळ सगळ्यांकडून भूलथापा देण्याचा हल्ली प्रयत्न सुरू आहे.कित्तेक शेतकरी बांधवांची मुले मोठ-मोठ्या पदावर जरी विराजमान झाले असले तरीही सर्वकाही विसरून केवळ आपलेच घर भरण्यात मग्न आहेत.अशातच हल्ली उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून शेतजमीन चांगलीच तहानलेली आहे.जमिनीला अक्षरश: भेगा पडल्या आहेत.त्यातच सिंचन सुविधांचा अभाव, अनियमित वीज पुरवठा आणि वाढत्या उष्णतेमुळे रब्बी हंगामातील धान व इतर पिके करपू लागली आहेत.त्यामुळे साहेब पिके कशी जगवायची; असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.

जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात धान व इतर पिके घेतली जातात.यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी धानासह मूंग,गहू, हरभरा, मका आदी पिके घेतली आहेत.मात्र काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या उष्णतेचा पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. खरिपाप्रमाणेच आता रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना सिंचनाअभावी पिके वाचविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

खरीप हंगामात पीक काढण्याची प्रक्रिया सुरू होणार होती; तेव्हा अवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले.या नुकसानीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात धान व इतर पिकाची लागवड केली. मात्र यावेळीही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.

कृषी पंपांना १२ तासांमध्ये केवळ आठ तास वीज पुरवठा केला जात असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. जमिनीची तहानही पूर्णतः भागत नाही.त्यातच दिवसा वीज पुरवठा न करता रात्री वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांसमोर वन्यप्राण्यांचेही संकट उभे ठाकले आहे.त्यामुळे शेतातील पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करतांना दिसून येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!