Sunday, August 23, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्याची दर्शनिका होणार तयार-डॉ.दिलीप बलसेकर यांनी जिल्हा दर्शनीका मनिर्मितीबाबत घेतली बैठक

गडचिरोली जिल्ह्याची दर्शनिका होणार तयार-डॉ.दिलीप बलसेकर यांनी जिल्हा दर्शनीका मनिर्मितीबाबत घेतली बैठक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

गडचिरोली :- दर्शनिका (गॅझेटीअर) विभाग, महाराष्ट्र शासनाचे कार्यकारी संपादक तथा सचिव डॉ.दिलीप पी.बलसेकर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे जिल्हा दर्शनीका निर्मितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

 गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास,भूगोल,सांस्कृतिक ओळख सांगणारे परिपूर्ण असे गॅझेटीअर(दर्शनीका) तयार करण्यात येणार आहे.गॅझेटीअर पुढील सहा महिन्यात तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी अधिकारी/कर्मचारी बैठकीला मोठया संख्येने उपस्थित होते.बैठकित उपस्थितांचे आभार माणून विषयाशी संबंधीत अधिकाऱ्यांना गॅझेटिअर बाबत माहिती देतांना बलसेकर यांनी सांगितले की, राज्य शासनाला सर्व जिल्ह्यांचे गॅझेटिअर बनवून द्यायचे आहे.त्यामुळे आपण तळमळीने लवकरात लवकर आपल्या संबंधीत माहिती दिली तर गॅझेटीअरचे(दर्शनीका)काम वेळेत पुर्ण होऊ शकेल. 

गॅझेटिअर ब्रिटीशकाळापासून वापरात असून ब्रिटीश लेाक जेव्हा येथे आले ते येथील भौगोलिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीशी अवगत नव्हते. त्यावेळेस त्यांना गॅझेटिअरची खूप मदत झाली. आजही आपण एखादी माहिती शोधण्याकरीता जुने गॅझेट उपयोगात आणतो. हायकोर्टानेही काही निर्णय देतांना गॅझेटिअरची मदत घेतली आहे. यातच गॅझेटीअर चे महत्व विशद होते. गॅझेटिअर हे भविष्यासाठी उत्तम असून आपल्याला पाहिजे असलेली जुनी माहिती येथील संस्कृती, भौगोलिक रचना माहित होते. त्यामुळे हे काम करतांना भूमिपुत्रांना माहिती गोळा करतांना समाविष्ट करुन घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी ऐतिहासिक ठिकाणे, पर्यटन स्थळं, ब्रिटीशकाळीन वास्तुशिल्पाचे छायाचित्र गॅझेटिअरसाठी लागणार असल्यामुळे ते गोळा करण्याचे निर्देश दिले. यावेळी सचिव श्री बलसेकर यांचे स्वागत निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ यांनी मानले. गोंडवाना विद्यापीठाचे प्राध्यापक नरेश मडावी यांनी गॅझेटीअर बाबतची माहिती कार्यकारी संपादक तथा सचिव यांना दिली.

जिल्हा गॅझेटीअरमध्ये बारा प्रकरणांचा समावेश असणार: बलसेकर यांनी उपस्थितांना माहिती देताना सांगितले की या गॅझेटिअरमध्ये वेगवेगळ्या विषयानुसार 12 प्रकरणांचा समावेश असेल. यामध्ये जिल्ह्याचा भूगोल, जिल्ह्याचा इतिहास, येथील लोकसंस्कृती, कृषी व जलसिंचन, उद्योगधंदे, बँक व्यापार व वाणिज्य, वाहतूक व दळणवळण, आर्थिक विकास, प्रशासन, सामाजिक सेवा, संस्कृती व प्रेक्षणीय स्थळे या प्रकरणांचा समावेश आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग काम करणार आहेत तसेच विदर्भातील इतिहासावरती अभ्यास करणारे गोंडवाना विद्यापीठासह इतर विद्यापीठातील प्राध्यापक यांची निवड या जिल्हा गॅझेटिअर निर्मितीसाठी केली जाणार आहे.

बलसेकर यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिली भेट : जिल्हा गॅझेट निर्मितीच्या अनुषंगाने श्री बलसेकर यांनी गोंडवाना विद्यापीठातील कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांची भेट घेतली. तसेच त्यांनी सर्च शोध ग्राम येथे जाऊन सामाजिक सेवा बद्दल माहिती जाणून घेतली त्यानंतर त्यांनी मेंढा लेखा येथे देवाजी तोफा यांचे कार्य जाणून घेतले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!