Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली शहरात स्वच्छतेचे तीन-तेरा….-सर्वोदय वार्डात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…..-नगरपरिषद प्रशासनाचे...

गडचिरोली शहरात स्वच्छतेचे तीन-तेरा….-सर्वोदय वार्डात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…..-नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- स्वच्छ,सुंदर म्हणविल्या जाणाऱ्या गडचिरोली शहरात स्वच्छतेचे तीन-तेरा होऊन बोजवारा वाजल्याचे दिसून येत आहे.नाल्यांचा उपसा तर झाला मात्र उपसा करण्यात आलेल्या नाल्यातील घाण तसेच कुडा-कचरा कित्तेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला पडून असल्याने वार्डातील तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न नगरपरिषद गडचिरोली तर्फे ऐरणीवर टांगला जात असल्याचे हल्ली दिसून येत आहे.

गडचिरोली शहरातील सर्वोदय वार्डाच्या श्री शंकर-पार्वती मंदिराकडील साईडच्या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.नागरिकांच्या मते, कित्तेक महिने नाल्यांचा उपसा केला जात नाही; अशातच नाल्यांचा उपसा केला तर नाल्यातील घाण बरेच दिवस रत्याच्या कडेला पडून असल्याने याचा वाली कोण? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.नगर परिषद गडचिरोली तर्फे नाली उपसा तसेच कित्तेक कामांचे लाखो रुपयांचे कंत्राट दिले जाते.मात्र एक ‘ना धड भाराभर चिंध्या’ असे हल्ली चित्र निर्माण झाले आहे.अशातच रात्रौच्या सुमारास डास,किडे, मच्छर व इतर कीटकजन्य डासांच्या प्रादुर्भावाने वार्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी नगर परिषद गडचिरोली यांनी खेळू नये व रस्त्याच्या कडेला असलेल्या घाण तसेच काडी-कचऱ्याची लवकरात लवकर उचल करावी; अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!