Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीग्रामरोजगार सेवक व मजुरांची ऑनलाइन हजेरीमुळे कुचंबना….-जुन्याच पद्धतीने हजेरी घेण्याची मागणी….

ग्रामरोजगार सेवक व मजुरांची ऑनलाइन हजेरीमुळे कुचंबना….-जुन्याच पद्धतीने हजेरी घेण्याची मागणी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांतील गावांमध्ये नेटवर्कचा अभाव असल्यामुळे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत चालू असलेल्या कामावर मजुरांची ऑनलाइन हजेरी घेताना ग्रामरोजगार सेवक व मजुरांनाही हजेरी देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.अशातच ग्रामरोजगार सेवक व मजुरांची ऑनलाइन हजेरीमुळे कुचंबना होत आहे.

ऑनलाइन हजेरी घेत असताना नेटवर्कचा प्रश्न निर्माण होतो.कधी मस्टर डाउनलोड तर गायब त्यामुळे ग्रामरोजगार सेवक व मंजूर मोठ्या अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्याच्या ठिकाणी दररोज ऑनलाइन हजेरी होत नसल्याने बऱ्याच ठिकाणी मजुरांनी मनरेगा कामाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे मनरेगा बिनकामाची ठरत आहे.महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऑनलाइन हजेरीमुळे मनरेगा कामात मोठी घट झाली असून गावपातळीवर बिनकामाची ठरली आहे. यापूर्वी मनरेगा अंतर्गत गावातच काम मिळत असल्याने मजुरांचे शहराकडे स्थलांतर होण्याचे प्रमाण थांबले होते. परंतु आता ऑनलाइन ई-मस्टर काढल्यानंतर आणखी त्रास वाढला आहे. मनरेगामध्ये काम करूनही कामाची मजुरी वेळेत मिळत नसल्याने मजुरांमध्ये नाराजीचा सूर आहे. ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’ अशी भावना मजुरांमध्ये निर्माण होता आहे.त्यामुळे ऑनलाइन हजेरी बंद करून जुन्याच पद्धतीने हजेरी घेण्याची मागणी जोर धरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!