उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज येथील समाजवादी पार्टीचे जिल्हा पदाधिकारी तथा सार्वजनिक बांधकाम विभाग देसाईगंज(वडसा)चे सेवानिवृत्त कर्मचारी महेबुब खाँ पठाण यांची आई खतिजा बेगम पीर खाँ पठाण वय अंदाजे ९७ वर्षे यांचे काल,दिनांक- २० जानेवारी रोजी शनिवारला रात्रौ १० वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक- २१ जानेवारी रोजी मुस्लिम कब्रस्तान देसाईगंज येथे अंत्यविधी करण्यात आले.त्यांचे पश्चात तीन मुले,दोन मुली व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

