Saturday, June 20, 2026
Homeबुलढाणाअन् लाच देणाराच अडकला एसीबीच्या जाळ्यात -लाच घेणाऱ्या पेक्षा; लाच देणाराच ठरला...

अन् लाच देणाराच अडकला एसीबीच्या जाळ्यात -लाच घेणाऱ्या पेक्षा; लाच देणाराच ठरला गुन्हेगार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

बुलढाणा :- लाच घेणाऱ्या पेक्षाही लाच देणारा हा सर्वात मोठा गुन्हेगार असल्याची घटना उघडकीस आली आहे.आपली करून कहाणी उघडकीस येऊ नये; याकरिता स्वतःहून समोरील व्यक्तीला भुरळ घालून अनेकांना पैश्याचे आमिष दाखविणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे.असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आला आहे.

दालमील कंपनीचा थकित टॅक्स कमी करण्यासाठी खामगाव येथील जीएसटी अधिका-याला अडीच लाख रूपयांची लाच देतांना मलकापूर येथील दालमिल व्यापाऱ्याला जालना अँटी करप्शन ब्यूरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले.बुधवार २० डिसेंबर रोजी खामगाव जीएसटी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर व्यापारक्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रविण मदनलाल अग्रवाल रा मलकापूर असे आरोपी व्यापा-याचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की,सहाय्यक राज्यकर आयुक्त, वस्तु व सेवाकर विभाग,खामगाव (जि. बुलढाणा) यांनी,दालमिल व्यवसायिक प्रविण मदनलाल अग्रवाल वय ४४ वर्षे मलकापूर जि. बुलढाणा यांच्या मे. बजरंग दालमिल इंडस्ट्रीजने २०१७-१८ या वित्तीय वर्षाचा २ कोटी ७७ लाख रूपयांचा टॅक्स थकवल्याने व्याजासह २ कोटी ९४ लाख रूपयांचा टॅक्स थकबाकी भरणा करणेबाबत तीनवेळा नोटीस बजावली होती. तसेच टॅक्सचा भरणा न केल्यास डिसेंबर २०२३ मध्ये मालमत्ता जप्तीची फायनल ऑर्डर काढण्यात येईल, असे कळविले होते.

त्यानंतर व्यापारी अग्रवाल हा टॅक्स कमी करुन फायनल ऑर्डर नील काढुन द्या, त्यासाठी तीन लाख रुपये देतो, असे म्हणून जीएसटी अधिका-याला लाच घेण्याची अपप्रेरणा देत होता. दरम्यान याबाबत संबंधित अधिका-याने जालना एसीबी कडे तक्रार नोंदवली.त्यावरून बुधवार दि.२० डिसेंबर रोजी एसीबी जालनाच्या पथकाने खामगाव येथे तक्रारीची पडताळणी करून सापळा लावला. कारवाई दरम्यान तक्रारदार अधिका-याच्या इच्छेविरुद्ध व्यापारी प्रविण अग्रवाल याने पंचासमक्ष सहाय्यक आयुक्त, वस्तु व सेवाकर विभाग कार्यालय खामगाव जि. बुलढाणा यांचे कक्षातील टेबलवर दोन लाख पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम ठेवली असता आरोपी व्यापा-यास एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले.लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून व्यापाऱ्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे खामगाव शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई किरण बिडवे पोलीस उपअधीक्षक,अँटी करप्शन ब्यूरो जालना, हे.का.गजानन घायवट,शिवाजी जमधडे,पो.का.गणेश बुजाडे,गणेश चेके आदींच्या पथकाने केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!