Sunday, September 6, 2026
Homeब्रम्हपुरीब्रम्हपुरीतील ३० ग्रामसभांचा वन संवर्धन व  व्यवस्थापन आराखडा प्रकाशित…..

ब्रम्हपुरीतील ३० ग्रामसभांचा वन संवर्धन व  व्यवस्थापन आराखडा प्रकाशित…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी :- वनहक्क अधिनियम,२००६ नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी कलम ३ (१) नुसार वैयक्तिक व सामूहिक वनहक्क किंवा दोन्ही धोरणाधिकार मिळण्याचा अधिकार प्राप्त झाले आहे.यामध्ये अनुसूचित जमाती किंवा इतर पारंपारिक वननिवासी यांना स्वतःच्या उपजीविकेकरिता शेती कसण्यासाठी वनजमिनी धारण करण्याचा व त्यामध्ये राहण्याचा हक्क,निस्तार  हक्क व गावाच्या सीमांतर्गत किंवा सीमेबाहेर पारंपारिकरीत्या गोळा केले जाणारे गौण वनोत्पादन गोळा करणे,त्याचा वापर करणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे यासाठी स्वामित्व हक्क,पाण्यामधील मत्स्य व अन्य उत्पादने,चराई करणे,पारंपारिक मोसमी साधनसंपत्ती मिळविण्यास हक्कदार असणे; निरंतर वापर करण्यासाठी पारंपारिकरीत्या संरक्षण व संवर्धन करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वनस्त्रोताचे संरक्षण,पुनर्निर्माण,संवर्धन,व्यवस्थापन करण्याचे हक्क इत्यादी विविध वनहक्क प्राप्त झाले आहेत. याकरिता अनुसूचित जमातीचे वननिवासी व इतर पारंपरिक वननिवासी यांच्या फायद्यासाठी सामूहिक वनसंपत्तीचे निरंतर व समसमान व्यवस्थापन करण्यासाठी ब्रम्हपुरी तालुक्यातील ३० गावातील सर्व ग्रामसभांनी राधा ऑर्गनायझेशन ब्रम्हपुरीच्या तांत्रिक मार्गदर्शनात दसवर्षीय सूक्ष्म नियोजन आराखडे तयार केले आहेत व त्यानुसार वन संवर्धन कार्य सुरू झाले आहे.सदरच्या ३० ग्रामसभांमध्ये बेलदाटी,दुधवाही,चांदगाव,वायगाव,धामनगाव,काटली चक,चिचगाव, बोदरा, गोगाव, बरडकिन्ही, गवर्ला चक,सायगाव, बेलगाव खुर्द, मुरपार,आक्सापुर,कोसंबी खड, पद्मापुर, सेलदा, चिटक बोदरा, किटाळी, लोहारडोंगरी, आवळगाव,हळदा, बोळधा, मुडझा, तोरगाव खुर्द, तोरगाव बुज, दिघोरी,चोरटी, पवनपार इत्यादींचा समावेश आहे.सदर कार्यास राधा ऑर्गनायझेशन ब्रम्हपुरीचे अध्यक्ष डॉ.हरीदास तुपटे यांच्या मार्गदर्शनात संस्थेचे कार्यकर्ते बळीराम बूल्ले,प्रितम ढोरे,दिलीप राऊत,अंकुश ठाकरे व गावातील असंख्य कार्यकर्त्यांचे योगदान लाभले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!