Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीमध्य प्रदेशात गोंगपाचे तुलेश्वर मरकाम विजयी….गडचिरोली गोंगपात आनंदोत्सव….

मध्य प्रदेशात गोंगपाचे तुलेश्वर मरकाम विजयी….गडचिरोली गोंगपात आनंदोत्सव….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

प्रा.मुनिश्वर बोरकर/ गडचिरोली

गडचिरोली :- नुकत्याच पार पडलेल्या मध्य प्रदेश मधील विधान सभेच्या निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार तुलेश्वर सिंह मरकाम हे आरी या चिन्हावर पाली तानाखार विधान सभा मतदार संघातून विजयी झाले आहेत.त्यांच्या विजयाचा आनंद उत्सव गडचिरोली येथील गोंगपाच्या कार्यकर्त्यां मध्ये संचारला असुन गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी गोंगपाकडे लक्ष देण्याची गरज आहे; असे गोंगपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत शामकांत मडावी यांनी म्हटले आहे. 

तुलेश्वर मरकाम यांनी कांग्रेसचे उमेदवार दुलेश्वरा सिदार हिला सात हजार मतांनी मागे टाकले आहे. अख्ख्या मध्य प्रदेशात बिजेपीची सत्ता आली परंतू तानाखार विधान सभा क्षेत्रात गोंगपाच्या मरकाम ने बिजेपीचे उमेदवार रामदयाल उईके यांना तिसर्‍या क्रमांकावर फेकले.मध्य प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी (मायावती ) व गोंगपाची युती होती यात दोन्ही पक्ष मिळून शंभर जागावर आपापले उमदेवराव उभे केले होते.गोंगपाचे विजयी उमेदवार तुलेश्वर मरकाम यांच्या विजयाचा आनंद उत्साव गोंगपाचे प्रदेश अध्यक्ष हरिष मडावी नागपूर,गोंगपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी,सचिव अंताराम पदा,वरिष्ठ नेते प्रा.रमेश कोरचा,साईनाथ कोडाप,किशोर मातलामी,महेंद्र सडमाके,मालता पुडो,प्रमिला कोडवते सहीत गडचिरोली जिल्ह्यातील गोंगपाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!