Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीडॉ.बाबासाहेब आंबेडकराचे शैक्षणिक कार्य प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे-ॲड.विनय बांबोळे

डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे शैक्षणिक कार्य प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे-ॲड.विनय बांबोळे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- शेड्युल कॉस्ट फेडरेशन तर्फे गडचिरोली तालुक्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारकबोडी येथे काल मंगळवार दिनांक- ७ नोव्हेंबर रोजी विध्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

विध्यार्थी दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी शेड्युल कॉस्ट फेडरेशनचे राष्टीय अध्यक्ष ॲड.विनय बांबोळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.मोलाचे मार्गदर्शन करतांना म्हटले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्या वर्गापासुनच इंग्रजी शिक्षण घेतले.शिक्षण घेतांना हाल अपेष्टा सहन करुन मोठे झाले.त्यांचे शैक्षणिक कार्य महान आहे.म्हणुनच डॉ.आंबेडकराचे शैक्षणिक कार्य प्रत्येक विद्यार्थ्यानी आत्मसात करणे आवश्यक आहे.

सदर कार्यक्रमास,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेड्युल कास्ट फेडरेशनचे राष्टीय अध्यक्ष ॲड.विनय बांबोळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन रिपब्लिकन पार्टी गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर, रिपब्लिकन पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे,शाळेचे मुख्याध्यापक देविदास गणविर , पोलिस पाटिल पंडित मेश्राम शेकाफेचे युवा नेते चेतन सहारे,रुषी कोसरे,आदि लाभले होते.याप्रसंगी प्रा.मुनिश्वर बोरकर म्हणाले की, भिमजन्मभूमी महु च्या आव्हानाला साद घालुन आजच्या दिनी प्रत्येक शाळेत ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणुन साजरा करावा.

इंग्रजी कालावधीत इंग्रजी वर प्रभुत्व गाजवुन शिक्षण पुर्ण करणारे घटनाकार डॉ.बाबा साहेब आंबेडकरांप्रमाणे विद्यार्थी तयार झाले पाहिजे; असा संदेश गोपाल रायपुरे यांनी दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणविर यांनी केले तर संचालन विनायक कोडापे व आभार प्रदर्शन प्रतिभा सुकारे हिने मानले. सदर कार्यक्रमास शाळेतील विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!