Monday, May 25, 2026
Homeकोरचीअखेर 'त्या' शिक्षकास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले निलंबित….-कोरची तालुक्यातील घटना….

अखेर ‘त्या’ शिक्षकास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले निलंबित….-कोरची तालुक्यातील घटना….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोरची(गडचिरोली) :- कोरची तालुक्यातील दुर्गम भागातील चर्वीदंड शाळेतील शिक्षक सुशील आडिकाने याने चक्क विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आपल्या जागेवर १५०० रुपये मानधनावर बनावट शिक्षकाची नियुक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी सदर शिक्षकाला निलंबित केले आहे.

कोरची मुख्यालयापासून १९ किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चर्वीदंड येथे १ ते ५ पर्यंतचे वर्ग आहेत.एकूण १६ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.परंतु येथील शिक्षक सुशील आडिकाने हे शाळेत येतच नव्हते.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.त्यानुसार शिक्षक सुशील आडिकने यांनी चर्वीदंड येथील एका बारावी शिक्षण झालेल्या विद्यार्थिनीला १५०० रुपये महिन्याप्रमाणे शाळेत शिकवायला ठेवल्याचे आढळून आले.अडिकाने यांनी एका बोगस शिक्षकाची नियुक्ती शाळेत केली होती.त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी शिक्षक सुशील आडिकाने यांना निलंबित केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!