Thursday, July 16, 2026
Homeदेसाईगंजकुरूड जिल्हा परिषद हायस्कुल शाळेचे विद्यार्थी चमकले राज्यात...

कुरूड जिल्हा परिषद हायस्कुल शाळेचे विद्यार्थी चमकले राज्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज (गडचिरोली):- जिल्हा परिषद हायस्कूल कुरुड शाळेचे मुख्याध्यापक वकील शेख यांना यंदाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.जय हिंद सेवाभावी सामाजिक संस्था परभणी व्दारा दर वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व कर्तृत्व गाजविणाऱ्या व्यक्तींचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो.यावर्षी महाराष्ट्रातील २२ व्यक्तींना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये वकील शेख यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वकील शेख यांना या पूर्वी महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार,मानव संसाधन मंत्रालय भारत सरकारचा युवा पुरस्कार सह अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून महाराष्ट्रातील अनेक सामाजिक, साहित्यिक,शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा संबंध असुन,मुंबई दूरदर्शन,आकाशवाणी नागपूर वरून त्यांच्या कविता प्रसारित झालेल्या आहेत. त्यांनी विविध विद्यार्थ्यांना घडवून आणले आहे.तशाच प्रकारे ‘इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्लू स्काय ॲण्ड वर्ल्ड ओझोन डे’ निमित्त महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मुंबईव्दारा आयोजित पोस्टर व रांगोळी स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कुल कुरूडच्या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केला आहे.संपूर्ण राज्यातुन वैष्णवी भजने हिने पोस्टरमध्ये तिसरा क्रमांक,तर कृतिका धोंगडे हिने रांगोळीमध्ये तिसरा क्रमांक पटकाविला आहे.तसेच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत खुशी शिंगाडे हिने १५०० मीटर धावणे,गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक आणि थाळीफेकमध्ये व्दितीय क्रमांक प्राप्त केले आहे. अभय ढोरे याने २०० मीटर धावण्यामध्ये व्दितीय स्थान पटकाविले आहे.सुयश प्राप्त विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक वकील शेख,शिक्षक डी.व्ही.रामटेके,बी. टी.सेलुकर, डब्ल्यु.के.भानारकर,एन.बी.मेश्राम,ए.ए. उईके,पी.वाय.नाकाडे,एच.आर.झाडे,डी.डी. ब्रह्मनायक,आर.व्ही.नारनवरे,निशा भाकरे,रोहिणी सहारे,यांच्यासह शाळा समितीच्या पदाधिका-यांनी कौतुक केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!