Thursday, August 27, 2026
Homeगोंदियाएकाचा नदीजवळ चिखलात पाय घसरला; वाचविण्याच्या प्रयत्नात दुसराही नदीत कोसळला....- १४ वर्ष...

एकाचा नदीजवळ चिखलात पाय घसरला; वाचविण्याच्या प्रयत्नात दुसराही नदीत कोसळला….- १४ वर्ष व १२ वर्षीय दोन्ही मुलांचा नदीत बुडून मृत्यू….- गोंदिया जिल्ह्यातील आज दुपारची घटना….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गोंदिया :- जिल्ह्यातील मुंडीपार(खुर्द) येथील पांगोली नदीमध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज २९ जुलै २०२३ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.दोन्ही मुले गावा नजीकच्या शेतशिवरात शेळ्या चराई करीता गेले होते.शेतशिवारा जवळच पांगोली नदीपात्र लागून आहे.शेळ्या चराई करता-करता नदी पात्रा जवळून एकाचा पाय चीखलात घसरला; चिखलात पाय घसरल्याने तो नदीमध्ये पडला.त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या मुलाने प्रयत्न केले.मात्र नदीमध्ये खोलवर पाणी असल्याने दुसराही पाण्यात बुडाला व दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.सदर मुलांचे नाव गंगाधर भिवाजी भरणे वय १४ वर्षे व आर्यन शालिकराम सहारे वय १२ वर्षे असून नदीपात्रा जवळून जातांना आर्यनचा पाय चिखलात घसरला व नदीपात्रात कोसळला; त्याला वाचविण्याचे प्रयत्न गंगाधर ने केले होते.मात्र सदरचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने दोन्ही मुलांचा करून अंत झाला.आर्यन आठवीत तर गंगाधर नववीत शिकत होता.सदर घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलीसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!