Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीनवउद्योजकांसाठी ५० लाखापर्यंत कर्ज योजना....- मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगाराच्या...

नवउद्योजकांसाठी ५० लाखापर्यंत कर्ज योजना….- मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी-प्र.जिल्हाधिकारी धनाजी पाटील

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- शहरी व ग्रामीण भागात सुशिक्षीत युवक युवतींना स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकरिता मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम ही योजना राज्य शासनामार्फत राबविली जाते.जिल्हयातील युवकांनी या योजनेचा फायदा घेवून जिल्हयात स्वयंरोजगार व रोजगाराच्या माध्यमातून विकासाला चालना द्यावी; असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी केले आहे. 

योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार लाभार्थ्यांचे मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज विहित कागदपत्रांसह सादर करावयाचा आहे.अर्ज मंजुरीनंतर शासनाकडून मिळणारे अनुदान उद्योग संचालनालयाव्दारे त्यांनी निर्धारित केलेल्या बँकांमार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते.ही योजना नवीन उपक्रम सुरु करण्यासाठी बँकामार्फत दिल्या जाणा-या कर्जात संलग्न अनुदान योजना आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत उत्पादन स्वरुपाच्या उद्योगास प्रकल्प मर्यादा रुपये 50,00,000/- लक्ष असून सेवा व कृषी पूरक उद्योग प्रवर्गातील प्रकल्पांसाठी कमाल रुपये 20,00,000/-लक्ष आहे.बँक व्दारा मंजुर शहरी भागातील राखीव प्रवर्गातील यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक, ना.मा.प्रवर्ग, भटके विमुक्त, अल्पसंख्यांक यांना प्रकल्पास 25% तर अराखीव प्रवर्गास 15% अनुदान देय राहणार आहे, तर  ग्रामीण भागातील राखीव प्रवर्गास 35% तर अराखीव प्रवर्गास 25% अनुदान देय राहणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम योजना जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे राबविण्यात येत असून, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आलेले कर्ज प्रकरणे जिल्हा कार्यबल समितीच्या शिफारसीने 67 कर्ज प्रकरणे 11 मे,2023 रोजी सरकारी बँकेसह खाजगी सहयोगी बँकांकडे सादर करण्यात आले आहे. बँकेव्दारा कर्ज मंजुर उमेदवारांना प्रशिक्षणाची सोय सुध्दा करण्यात आलेली आहे. तरी इच्छुक युवक युवतींनी जिल्हा उद्योग केंद्रास संपर्क साधावा व मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र,गडचिरोली यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!