- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारच्या सायंकाळी सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात ५३ वर्षीय नानाजी नारायण कामडी नामक शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ताजी असतांनाच परत आज, रविवार २५ ऑक्टोंबर रोजी सिंदेवाही तालुक्यातील भेंडाळा येथे वाघाच्या हल्ल्यात अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.प्रेमीला पुंडलिक महाडोरे वय ५० वर्षे,रा.भेंडाळा,ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर असे मृत महिलेचे नाव आहे.त्या भेंडाळा येथे अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आज रविवारी अंगणवाडीला सुट्टी असल्याने प्रेमीला महाडोरे या दुपारच्या सुमारास स्वतःच्या शेतात तिळाची कापणी करण्यासाठी गेल्या होत्या.तिळाची कापणी करीत असतांना परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवून नरडीचा घोट घेतला.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेमुळे भेंडाळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतशिवारात काम करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.या घटनेनंतर वनविभागाकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.सदरच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून,वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

