Saturday, October 24, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते शरबतचे वाटप

देसाईगंज येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते शरबतचे वाटप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- घटनेचे शिल्पकार,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  १३२ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून १४ एप्रिल २०२३ रोजी  सायंकाळच्या सुमारास देसाईगंज शहरातून निघालेल्या रॅलीतील बौद्ध उपासक,उपासिका व इतर नागरिकांना नैनपुर रोड टी पॉइंट येथे मान्यवरांच्या हस्ते शरबतचे वाटप करण्यात आले.

देसाईगंज शहरातील मिलिंद बुद्ध विहार आणि जेतवण बुद्ध विहार यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.त्या निमित्ताने शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले.बौद्ध उपासक,उपासिका व इतर नागरिक मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

नैनपुर रोड टी पॉइंट याठिकाणी रॅलीचे आगमन होताच डॉ.विजय मेश्राम(माजी कार्यकारी अभियंता), पुरुषोत्तम दुधे विपश्यना केंद्र प्रमुख, नुबिर फुले(अभियंता),सामाजिक कार्यकर्ता तथा समाजवादी पार्टी देसाईगंज तालुका महासचिव प्रितम जनबंधू व इतर मान्यवरांनी मिळून शरबतचे वाटप करून जयंती दिनाचे कार्यक्रम स्वतः पुढाकार घेऊन पूर्णत्वास नेले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत.. -अप्रमाणित संदेशांवर शेतकरी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये; जिल्हा परिषदेच्या संबंधित...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत तसेच ते जप्त करण्याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत, असा खुलासा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!