- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार १२ ऑक्टोंबर २०२६ रोजी घडली.प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी आज बुधवारी आश्रमशाळेला भेट देत परीस्थितीचा आढावा घेतला.यावेळी उपस्थित कुरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय जगताप यांच्याशी चर्चा केली व मृतक विद्यार्थिनीच्या कूटूंबियांची भेट घेत सांत्वन केले.यावेळी आमदार मसराम यांनी आश्रमशाळेत शिकणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत त्यांना धिर दिला.तसेच मूख्याध्यापक सुनिल मिसार यांचाशी प्रकरणाची सखोल माहिती घेतली व विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती समजून घेण्याची गरज अधोरेखित केली.

यावेळी उपस्थित पोलीस निरीक्षक अजय जगताप यांचाशी सूद्धा चर्चा करीत मुलीने आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेण्यास कोणती परीस्थिती कारणीभूत ठरली,याबाबत सखोल चौकशी करण्याची सूचना केली.यानंतर मोहगांव येथे मृतक विद्यार्थिनीच्या कूटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले व आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी कुरखेडा कांग्रेस तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट,जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे,माजी जि.प.सदस्य प्रभाकर तुलावी,माजी सभापती गिरीधर तितराम,माजी सरपंच दादाजी प्रधान,माजी उपसरपंच झूनूकलाल चौधरी,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य वनिता नैताम,वर्षा किरंगे,योगेश हलामी,ग्रामपंचायत सदस्य मनोहर दहिकर,प्रकाश गोटा,मोहन प्रधान आदी उपस्थित होते.

- Advertisement -

