Thursday, October 15, 2026
Homeगडचिरोलीआश्रमशाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या; आदिवासी विकास मंत्र्यांकडून दखल.. -अधीक्षिकेच्या निलंबनाचे निर्देश; कुटुंबीयांना दोन...

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या; आदिवासी विकास मंत्र्यांकडून दखल.. -अधीक्षिकेच्या निलंबनाचे निर्देश; कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेची आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी गंभीर दखल घेतली आहे.या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे तसेच संबंधित अधीक्षिकेला तात्काळ निलंबित करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना अनुग्रह अनुदान म्हणून दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर डॉ.उईके यांनी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली.या प्रकरणात कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.यानंतर पत्रकारांशी बोलतांना डॉ.उईके यांनी आश्रमशाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.घटनेच्या अनुषंगाने संबंधितांची जबाबदारी तपासून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
गडचिरोली प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आश्रमशाळांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही डॉ.उईके यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या. आश्रमशाळांतील मुख्याध्यापक आणि अधीक्षक-अधीक्षिकांशी नियमित संवाद व संपर्क ठेवून शाळा आणि वसतिगृहांतील परिस्थितीची माहिती घ्यावी, असे त्यांनी सांगितले.यापुढे आश्रमशाळांमध्ये अशा प्रकारची घटना घडल्यास संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करून कारवाई करण्यात येईल,असा इशारा डॉ.उईके यांनी दिला.
यावेळी आमदार डॉ.मिलिंद नरोटे,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण एम.,माजी आमदार कृष्णा गजबे,माजी आमदार नामदेवराव उसेंडी,चांगदेव फाये व संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!