- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-नुकतेच काही दिवसांपूर्वी शासकिय निधीचे नुकसान करणे व इतर अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी निलेश पी.जवंजाळकर यांना गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ)सुहास गाडे यांनी आदेश जारी करून निलंबित केल्याचे प्रकरण ताजे असतांनाच आता गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील चातगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी(ग्रामसेवक)रणजीत जयसिंग राठोड यांनाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केल्याने जिल्ह्याच्या पंचायत विभागात एकच खळबळ उडाली असून आता पुढील नंबर कुणाचा? याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.निलंबन कालावधीत राठोड यांचे मुख्यालय पंचायत समिती एटापल्ली येथे निश्चित करण्यात आले आहे.
धानोरा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या चातगाव
ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी रणजीत राठोड यांच्या विरोधात गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार,अनियमितता व गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी केल्या होत्या.विविध विकास कामांच्या हिशेबाची मागणी केली असता हिशेब न देणे,ग्रामसभेत हिशेब सादर न करणे,ग्रामसभांना उपस्थित न राहणे,तब्बल तीन ग्रामसभेत गैरहजर राहून मनमानी कारभार चालवला होता.याबाबतच्या तक्रारींचा पाढा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्याकडे जाताच दखल घेण्यात आली.त्यानुसार, ग्रामपंचायत चातगाव येथील दप्तर तपासणी करण्यात येणार असून तपासणी व चौकशीदरम्यान अडथळे निर्माण होऊ नयेत,यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा(शिस्त व अपील)नियम,१९६४ अधिनियम (तीन/एक) नुसार राठोड यांना निलंबित करण्यात आले.
- Advertisement -

