Thursday, October 1, 2026
Homeगोंदियादुचाकीचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू..

दुचाकीचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-दोन दुचाकींच्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला,तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल बुधवारच्या मध्यरात्री गोंदिया-गोरेगाव मार्गावर घडली.पीयूष योगेश बारेवार वय २८ वर्षे,रा.गोरेगाव,मनोज कुरंजेकर वय २७ वर्षे आणि विनय कोहरे वय २८ वर्षे,दोघेही रा.सोनी,ता.गोरेगाव, जि.गोंदिया अशी अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत.तर जखमी तरुण गोरेगाव येथील असून जखमीवर गोंदियातील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पीयूष व त्याचे सहकारी मित्र बुधवारी  गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी गोंदिया येथे गेले  होते.मिरवणूक आटोपून रात्री उशिरा ते गोरेगावच्या दिशेने परतत असतांना हिरडामाली ते मिलटोली परिसरात दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला.यात दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले व घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गोंदिया ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले,तर जखमीला तातडीने रुग्णालयात हलवले.नेमका अपघात कशामुळे घडला,याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर उद्या होणारा व्यापारी संघटनांचा ‘नो यूपीआय डे’ मागे..!

उद्रेक न्युज वृत्त :-यूपीआय व्यवहारांवर मर्चेंट डिस्काउंट रेट(MDR)लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या प्रस्तावित निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.या निर्णयाचा तीव्र निषेध...

उपविभागीय अभियंता बाळू षटगोपनवार यांचा निरोप समारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंदेवाहीचे उपविभागीय अभियंता बाळू जगन्नाथ षटगोपनवार यांच्या सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ आज गुरुवारी उत्साहात पार पडला.यावेळी षटगोपनवार यांचा...

गडचिरोलीत गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी एचपीव्ही लसीकरण; १ हजार २५४ किशोरवयीन मुलींना दिली लस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी गडचिरोली जिल्ह्यात शंभर टक्के एचपीव्ही लसीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आदिवासी व...

आजपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या ‘या’ प्रवाशांना एक ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा कडक निर्णय घेत 'आरक्षित' केलेल्या तिकिटांवर किंवा 'ई-पास'वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज,गुरुवार १ ऑक्टोंबरपासून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!