उद्रेक न्युज वृत्त :-राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीचा प्रवास करण्यासाठी महामंडळाने ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य केले आहे.प्रवाशांना नानाविध सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवे प्रयोग अंमलात आणत आहे.प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्या या हेतूने नवनव्या सवलती लागू केल्या जात आहेत.मात्र पात्र लाभार्थ्यांसोबतच कित्येक जण या सुविधा अवैधरित्या लाटत आहेत.या प्रकारावर आळा बसावा यासाठी महामंडळाने महिला,ज्येष्ठ नागरिक व अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या ५० टक्के व निःशुल्क प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक केले आहे. विशेष म्हणजे,यंत्रणेच्या सर्व्हरवर ताण आल्याने व प्रवाशांची होत असलेली अडचण लक्षात घेता महामंडळाने कार्डच्या अनिवार्यतेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती.मात्र,देण्यात आलेली ही मुदत आज,बुधवार ३० सप्टेंबर संपत असून उद्या,गुरुवार १ ऑक्टोंबरपासून प्रवाशांना परत एकदा प्रवासात कार्ड बाळगणे बंधनकारक राहणार असून त्याद्वारेच तिकीट दिले जाणार आहे.सवलतीच्या लाभासाठी प्रवाशांनी आपले कार्ड तयार करून घ्यावे असे आवाहन महामंडळाने केले आहे.
उद्यापासून बस प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

