- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला.विशेष म्हणजे,मुलीची प्रकृती बिघडल्याने वैद्यकीय तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सदरचा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला.याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी १९ वर्षीय श्रीधर ईश्वर राजकट्टा याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.आरोपी तरुण व मुलीची एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला.एप्रिल २०२६ मध्ये आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.घटनेनंतर काही दिवसांनी मुलीची प्रकृती बिघडली.त्यामुळे कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता तपासणीदरम्यान ती सुमारे पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.सदरचा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.तक्रारीच्या आधारे पोलिसांनी श्रीधर राजकट्टा याच्या विरोधात पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदविला व त्यास अटक केली.
- Advertisement -

