- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ
बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला होता.दरम्यान,संपाची सुरुवात ही मोठ्या आंदोलनाची तयारी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले होते.मागण्यांवर तोडगा निघाला नाही,तर यूनियनने २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत या तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली होती.त्यानुसार,आज बुधवार २३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेकडून ग्राहकांना मॅसेजद्वारे कळविण्यात आले आहे.त्यात त्यांनी म्हटले की,प्रिय ग्राहक,बँकेच्या काही कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या तीन दिवसांच्या संपाची हाक दिली आहे.त्यामुळे कृपया महत्त्वाची व्यवहारे आगाऊ पूर्ण करा.संप काळात एटीएम/एडीडब्ल्यूएमएस, सीएसपीएस,योनो,इंटरनेट/मोबाइल बँकिंग,यूपीआय आणि इतर डिजिटल माध्यमांचा वापर करागैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.-स्टेट बँक ऑफ इंडिया.असा संदेश बँकेकडून प्राप्त झाला आहे.

विशेष म्हणजे,२६ सप्टेंबरला चौथा शनिवार आणि २७ सप्टेंबरला रविवार व २८ सप्टेंबर सोमवार,२९ सप्टेंबर मंगळवार आणि ३० सप्टेंबर बुधवार या तीन दिवसांच्या संपाची हाक असल्याने ग्राहकांना सलग पाच दिवस शाखा-आधारित बँकिंग सेवांपासून दूर राहावे लागेल. अश्यातच ३० सप्टेंबर हा बँकांचा सहामाही आर्थिक वर्षअखेरचा महत्त्वाचा दिवस असल्याने या संपाची वेळही संवेदनशील आहे. एकूणच,२६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोंबरपर्यंत म्हणजेच तब्बल ९ दिवसांत बँका केवळ दोन दिवसांसाठीच खुल्या राहतील.पाच दिवसांचा बँकिंग आठवडा,पेन्शनमध्ये सुधारणा,निवृत्तांना समान महागाई भत्ता सूत्र आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेतील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय,अशा मागण्या संघटनांनी केल्या आहेत.पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्याची मागणी अद्याप चर्चेत आहे.वित्त मंत्रालयाने संप मागे घेऊन उर्वरित प्रश्न चर्चेतून सोडवण्याचे आवाहन केले आहे.मात्र,संप झाल्यास रोख जमा-उचल, चेकशी संबंधित कामे,कागदपत्रे,केवायसी,डिमांड ड्राफ्ट आणि इतर शाखा-आधारित व्यवहारांवर परिणाम होणार आहे.व्यापारी,लघुउद्योजक,ज्येष्ठ नागरिक आणि प्रत्यक्ष बँक शाखेवर अवलंबून असलेल्या ग्राहकांची विशेष गैरसोय होईल.सहामाही आर्थिक वर्षअखेरच्या काळात व्यवहारांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणातील आर्थिक व्यवहारांवर होऊ शकतो. त्यामुळे,बँकेशी निगडित कामे असतील तर लवकर उरकून घ्या.
- Advertisement -

