- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे.त्यामुळे,उत्पादक शेतकरी बांधवांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.सदरची अडचण लक्षात घेता आता शेतकऱ्यांना स्वतःच मोबाईल ॲपवरून आपल्या शेतातील ई-पीक पाहणी करता येणार आहे.ई-पीक पाहणीचे काम अधिक जलद,सुलभ व पारदर्शक पद्धतीने तसेच शेतकऱ्यांच्या सोयीचे होण्यासाठी डीसीएस एमएच मोबाईल ॲपमध्ये शेतकरी स्तरावरून पीक नोंदणी करण्याची सुविधा ११ सप्टेंबर २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे या सुविधेअंतर्गत आता शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून डीसीएस एमएच मोबाईल ॲपमध्ये आपला शेतकरी ओळख क्रमांक व फार्मर आयडी प्रविष्ट करून शेतातील पिकांची नोंदणी करू शकतील.विशेष म्हणजे,ई-पीक नोंदणीची माहिती विविध शासकीय योजना,अनुदान व इतर शासकीय सेवांचा लाभ देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी डीसीएस एमएच मोबाईल ॲपचा वापर करून शेतातील पिकांची नोंदणी करून शासकीय योजना लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात येत आहे.
- मोबाईल ॲपद्वारे नोंदणी👇
गुगल प्ले स्टोअरवरून अधिकृत DCS MH/ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाउनलोड करा.
ॲप सुरू करून तुमचा चालू मोबाईल नंबर टाका आणि प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.
सात/बारा उताऱ्यावर दिलेल्या खात्यादाराचे नाव निवडा आणि योग्य महसूल विभाग(जिल्हा,तालुका, गाव)निवडा.
शेतात प्रत्यक्षात उभे राहून जीपीएस(GPS)सुरू ठेवा आणि पिकाचा स्पष्ट फोटो ॲपमध्ये अपलोड करा.
पिकाचे नाव,हंगाम आणि क्षेत्र अचूक भरून माहिती अंतिम सबमिट करा.
- Advertisement -

