- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
उमरेड(नागपूर):-शेतात मिरचीच्या पिकाची डवरण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा जवळच कोसळलेल्या विजेमुळे मृत्यू झाला,तर पत्नी थोडक्यात बचावली.मात्र, जोडीतील एका बैलाला दुखापत झाल्याची घटना उमरेड तालुक्यातील अकोला शेतशिवारात काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.महादेव शिवराम साखरकर वय ७० वर्षे,रा.अकोला,ता.उमरेड,जि.ना गपूर असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
महादेव साखरकर हे पत्नी कलावतीसोबत शेतात मिरचीच्या पिकाची डवरण करण्यासाठी गेले होते.
शेतात काम करीत असतांना सायंकाळी साडे चार वाजताच्या सुमारास हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे महादेव व त्यांची पत्नी शेतातील झाडाखाली आडोशाला गेले.काही वेळाने पाऊस उघडताच महादेव यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली.दरम्यान,काम करत असतांनाच आकाशात जोरात कडाडलेली वीज थेट त्यांच्या जवळ कोसळली.यात ते गंभीररीत्या होरपळल्याने महादेव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर जोडीतील एक बैल किरकोळ जखमी झाला.त्यांच्या पत्नी व जोडीतील दुसरा बैल मात्र थोडक्यात बचावला. माहिती मिळताच महसूल व पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला आणि त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी उमरेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.याप्रकरणी उमरेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
- Advertisement -

