Sunday, September 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही,विद्यार्थ्याला शिक्षा देण्याची शिक्षकाची पद्धत चुकीची आणि असंवेदनशील असू शकते; परंतु जोपर्यंत त्यामागे कोणताही लैंगिक हेतू सिद्ध होत नाही,तोपर्यंत पॉक्सो कायद्यानुसार त्याला लैंगिक हल्ला मानता येणार नाही.न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि न्यायमूर्ती अतुल एस.चांदूरकर यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करतांना शिक्षकाविरोधात पॉक्सो कायद्याच्या कलम १० (गंभीर लैंगिक हल्ला)अंतर्गत दाखल केलेला गुन्हा रद्द केला.
आरोपी पश्चिम बंगालच्या अलिपुरद्वार जिल्ह्यातील एका शाळेत भूगोल शिकवत असतांना वर्गात प्रश्नांची उत्तरे देऊ न शकल्याने इयत्ता दहावीच्या दोन विद्यार्थिनींना पाठीवर आणि कमरेवर मारहाण केल्याचा आरोप शिक्षकावर होता.मात्र,२४ जून २०२५ रोजी महिला शिक्षकांच्या एका गटाने मुख्याध्यापकांना कळवले की,इयत्ता दहावीच्या काही मुलींनी शिक्षकाकडून शारीरिक स्पर्श झाल्याची तक्रार केली आहे.त्यानुसार, दुसऱ्या दिवशी एक बैठक झाली आणि त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण पथकाला माहिती देण्यात आली.नंतर त्यांच्या प्रतिनिधींनी शाळेला भेट दिली व चौकशी अहवालात शिक्षकावर आरोप निश्चित करण्यात आले. आरोपानंतर २३ जुलै २०२५ रोजी पॉक्सो कायद्याच्या कलम १० अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला,जे गंभीर लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की,विद्यार्थिनींशी व्यवहार करतांना शिक्षकाने अधिक संवेदनशील असायला हवे होते,हे न्यायालयाने मान्य केले.परंतु केवळ असंवेदनशील वर्तनाच्या आधारावर त्यांच्यावर पॉक्सोसारखा गंभीर खटला चालवला जाऊ शकत नाही.ही तरतूद तेव्हा लागू होते,जेव्हा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा,इतरांबरोबरच, शैक्षणिक संस्थेच्या कर्मचाऱ्याकडून केला जातो.कलम ७ अंतर्गत लैंगिक अत्याचारासाठी शारीरिक संपर्कासोबत लैंगिक हेतू असणे आवश्यक आहे. कोणत्याही शिक्षकावर लैगिक शोषणाचा आरोप झाला,तर ते केवळ त्याच्या करिअरसाठीच नव्हे,तर त्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी आणि कुटुंबासाठी विनाशासारखे असते. शिक्षकाचे जीवन उद्ध्वस्त करण्यासारखे आहे.खटला चालू ठेवणे म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर ठरेल आणि त्यामुळे शिक्षकाचे अत्यंत नुकसान होईल,असे मत व्यक्त करत न्यायालयाने कलकत्ता उच्च न्यायालयाचा २७ एप्रिलचा आदेश रद्द केला व अलिपूरद्वार येथील विशेष न्यायालयात प्रलंबित असलेली संपूर्ण कार्यवाही रद्द करून शिक्षकाला दिलासा दिला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी गावपातळीवर प्रसिद्ध.. – गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’च्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील ३ हजार ६१० शेतकरी पात्र ठरले आहेत.पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा...

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!