- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात एका अजब लाचेची गजब कहाणी उघडकीस आली आहे.लाच घेणारे दुसरे कुणी नाही,तर चक्क पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक(पीएसआय)व पोलीस अंमलदार असल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.प्रकरणातील विशेष बाब म्हणजे,चक्क पोलीस उपनिरीक्षकाने १० हजाराच्या लाचेची मागणी करतांना दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून लाचेची मागणी केली.तर पोलीस अंमलदाराने मिळून-मिसळून लाच स्वीकारल्याने या प्रकरणी प्रशांत बाळासाहेब पासलकर वय ४१ वर्षे,व्यवसाय-नोकरी,पद-पोलीस उपनिरीक्षक(वर्ग-२),नेमणूक-मुकुंदवाडी पोलीस स्टेशन,छत्रपती संभाजीनगर व सुभाष छगन राठोड,वय ३६ वर्षे,व्यवसाय-नोकरी,पद-पोलीस अंमलदार(वर्ग-३), नेमणूक-मुकुंदवाडी पोलीस स्टेशन,छत्रपती संभाजीनगर यांना छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदार यांचेकडुन १० हजार रुपये लाचेची मागणी करुन ५ हजार रुपये लाच रक्कम स्विकारल्याने रंगेहाथ पकडले.
प्रकरणातील तक्रारदार ४२ वर्षीय महिला असून
तक्रारदार व त्यांच्या दोन मुलांवर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.सदर दाखल गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पासलकर व त्यांचे मदतनीस पोलीस अंमलदार सुभाष राठोड हे गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तसेच तक्रारदार यांच्या मुलाला जेलमधून सोडविण्यास मदत करण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी करीत होते.तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सोमवार ७ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.त्यानुसार,त्याच दिवशी दोन्ही आरोपी लोकसेवकांची पोलीस स्टेशन मुकुंदवाडी येथे लाच मागणीची पडताळणी करण्यात आली.पडताळणीदरम्यान,प्रशांत पासलकर यांच्या समक्ष सुभाष राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपयांची मागणी करून त्यापैकी ५ हजार रुपये स्वतः स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर, मंगळवार ८ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित सापळा कारवाईदरम्यान पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पासलकर यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष दोन्ही हातांची दहा बोटे इशारा करून १० हजार रुपये मागणी केली.तसेच आरोपी सुभाष राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे १० रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दिली.त्यानुसार,आरोपी सुभाष राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपये अँध्रासीन पावडर लावलेली लाचेची रक्कम पंचासमक्ष पोलीस स्टेशन मुकुंदवाडीच्या आवारात स्वतः स्वीकारली.त्यावेळी त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले व काल बुधवारी पोलीस ठाणे मुकुंदवाडी येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपी लोकसेवक यांना सायंकाळी ६.१५ वाजता अटक करण्यात आली.
सदरची कारवाई श्रीमती माधुरी केदार कांगणे,पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मो.क्र. 9011092777,शशीकांत सिंगारे,अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मो.क्र. 9923102205 यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी-संतोष तिगोटे,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर.मो.क्र.9923453888,तपास अधिकारी-वाल्मीक कोरे,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर,मो.क्र. 9623565310,
पर्यवेक्षक अधिकारी-बाळासाहेब शिंदे,पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मो.क्र. 9923338565,सापळा पथक-पोलीस हवालदार
साईनाथ तोडकर,राजेंद्र सिनकर,ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर आदींनी यशस्वी केली.
- नागरिकांना आवाहन👇
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की,भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुध्द तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी खालील नमुद केल्याप्रमाणे संपर्क साधावा.
घटक कार्यालय- ला.प्र.वि.कार्यालय,जुने तहसिल कार्यालय,जुना बाजार,छत्रपती संभाजीनगर, 431001
दुरध्वनी क्रमांक- 0240-2344050
टोल फ्री क्रमांक -1064
व्हॉट्सअप क्रमांक-7720891064
इ-मेल आयडी-
dysp.acbcsn@mahapolice.gov.in
परिक्षेत्र कार्यालय -ला.प्र.वि.कार्यालय,जुने तहसिल कार्यालय,जुना बाजार,छत्रपती संभाजीनगर, 4310001
इ-मेल आयडी-
spacbaurangabad@mahapolice.gov.in
- Advertisement -

