Wednesday, September 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कमी पावसाच्या काळात शेतातील उपलब्ध पाणी टिकवून ठेवण्यासाठी बांध-बंदिस्ती मजबूत करावी. विशेषतः फुटवे अवस्था,लोंबी येण्याची अवस्था,फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही,याची दक्षता घ्यावी.तण नियंत्रण वेळेवर करावे तसेच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच खत व्यवस्थापन करावे.कोरड्या जमिनीत मोठ्या प्रमाणात युरिया देणे टाळावे.धान पिकाची नियमित पाहणी करून खोडकिडा,गादमाशी,कडा करपा आणि पर्णकोष करपा यांसारख्या कीड-रोगांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे.प्रादुर्भाव आढळल्यास कृषी विभागाच्या शिफारशीनुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात. विनाकारण फवारणी न करता प्रादुर्भावाची तीव्रता पाहूनच कीड-रोग नियंत्रण करावे.
शेतकऱ्यांनी तण वाढू देणे,विनाकारण फवारणी करणे तसेच एकाच वेळी अनेक खते किंवा औषधांचे अनावश्यक टँकमिश्रण करणे टाळावे.पिकाची नियमित पाहणी करून परिस्थितीनुसार योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.किशोर झाडे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!