- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला. त्यानुसार,न्यायालयाने जप्तीचे आदेश देत रक्कम वसूल करण्याचे फर्मान सोडताच थेट उपविभागीय कार्यालयातील एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त करण्यात आल्याने परिसरात एकच चर्चा रंगली.विशेष म्हणजे,शासकीय गाडीही जप्त करण्याचे आदेश होते.मात्र,उपविभागीय अधिकारी(एसडीओ)
हे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेल्याने वाहनाची जप्ती टळली.सदरचा प्रकार गोंदिया शहरात काल गुरुवारी घडला.
गोंदिया शहराच्या क्रीडा संकुल परिसरातील राजू नागवंशी यांच्या मालकीची सुमारे ११ आर जमीन सन २००९ मध्ये भूसंपादन प्रक्रियेत घेण्यात आली होती.या जमिनीच्या मोबदल्याबाबत शासनाकडून रक्कम मिळाली.मात्र,वाढीव मोबदला मिळत नसल्याचा दावा नागवंशी यांनी केला.वाढीव मोबदल्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला.मात्र,अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.या प्रकरणाची सुनावणी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात झाली.न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित रकमेच्या वसुलीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश देण्यात आले.त्यानंतर,काल गुरुवारी तक्रारदार यांच्या वकिलासह न्यायालयातील कर्मचारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात जात कारवाईला सुरुवात केली. यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्या खुर्चीसह कार्यालयातील इतर साहित्य जप्त करण्यात आले. तक्रारदार राजू नागवंशी यांच्या वकिलांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई करण्यात आल्याने कार्यालयात एकच धांदल उडाली.
- Advertisement -

