Friday, October 9, 2026
Homeगोंदियाअंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षाच्या चिमुकलीच्या अंगावर जीर्ण झालेल्या घराची भिंत कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेत भिंतीखालील मलब्यात दबून चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.प्रतीक्षा मुकेश राऊत वय २ वर्षे,रा.कोरंभी असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.ही घटना आज सोमवारच्या दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.
प्रतीक्षाचे आई-वडील मोलमजुरी आणि शेतीची कामे करून आपला उदरनिर्वाह करतात.सध्या शेतीची कामे सुरु असल्याने आज सोमवारी प्रतीक्षाच्या आई-वडिलांना निंदण काढण्याच्या कामासाठी शेतावर जायचे असल्याने तिला खामखुरा येथील नातेवाईक केशव नेवारे यांच्या घरी आणून ठेवले होते.
दरम्यान,दुपारच्या सुमारास प्रतीक्षा नेहमीप्रमाणे घरासमोरील अंगणात खेळत होती.अंगणाला लागूनच विलास नेवारे यांचे एक जुने आणि पडके घर आहे. मागील काही दिवसांपासून परिसरात पाऊस सुरू असल्याने,घराची भिंत पूर्णपणे ओली आणि आतून कमकुवत झाली होती.चिमुकली खेळत असतांनाच अचानकपणे भिंत थेट तिच्या अंगावर कोसळली.माती आणि विटांच्या ढिगाऱ्याखाली प्रतीक्षा दबली गेली आणि यातच तिचा मृत्यू झाला.घटना घडताच  आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील जयप्रकाश लाडे यांनी तात्काळ अर्जुनी मोरगाव पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोका चौकशी करून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!