Thursday, October 8, 2026
Homeदेसाईगंजरक्तदानातून आमदार रामदास मसराम यांना ५७ व्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा.. - आज...

रक्तदानातून आमदार रामदास मसराम यांना ५७ व्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा.. – आज ५७ रक्तदात्यांचे रक्तदान; मिसार दाम्पत्य ठरले प्रेरणादायी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या उद्या,शनिवार २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस आरमोरी विधानसभा क्षेत्र व आमदार रामदास मसराम मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज, शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी देसाईगंज शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात तब्बल ५७ रक्तदात्यांनी रक्तदान करून आमदार रामदास मसराम यांना ५७ व्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.
या शिबिरात ६० वर्षीय धनपाल मिसार व त्यांच्या अर्धांगिनी धनश्री मिसार या दाम्पत्याने रक्तदान करून विशेष लक्ष वेधून घेतले.वयाच्या पन्नाशीनंतरही रक्तदानाची सामाजिक बांधिलकी जपत या दाम्पत्याने युवकांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
“रक्तदान करण्यासाठी वयापेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची आहे.आपण दिलेले रक्त एखाद्याचे प्राण वाचवू शकते. त्यामुळे युवकांनी पुढे येऊन नियमित रक्तदान करावे,” असा प्रेरणादायी संदेश धनपाल मिसार व धनश्री मिसार यांनी दिला.विशेष म्हणजे,वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या उत्सवाला सामाजिक कार्याची जोड देत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्यामुळे ५७ रक्तदात्यांचे रक्तदान आणि मिसार दाम्पत्याची प्रेरणादायी सहभागिता या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून ‘वाढदिवसाचा आनंद समाजाच्या सेवेतून साजरा करा’असा विधायक संदेश देण्यात आला.रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.यावेळी उपस्थित माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले,देसाईगंज काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,देसाईगंज पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन राऊत,देसाईगंज नगर परिषदेचे नगरसेवक तथा गटनेते विकास प्रधान,शालु दंडवते,आशा दहीवले,श्याम उईके,राधिका पत्रे,मंदा समर्थ,इलियास खान,फेमिदा पठाण,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,प्रकाश समर्थ,आक्रोश शेंडे तथा समस्त काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.तर आयोजक म्हणून युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष कमलेश बारस्कर,सागर वाढई, तालुकाधक्ष अमर भर्रे,जितू चौधरी,लंकेश ढोरे,निलेश दुपारे व सर्व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!