Wednesday, October 7, 2026
Homeनागपूरआश्रमशाळेतील गैरप्रकार प्रकरणी आरोपी शिपायास पोलिस कोठडी..

आश्रमशाळेतील गैरप्रकार प्रकरणी आरोपी शिपायास पोलिस कोठडी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसोबत कथित गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपावरून आश्रमशाळेच्या नाइट वॉचमनला कोंढाळी पोलिसांनी अटक केली आहे.राजेश मुलचंद मालापुरे वय ४४ वर्षे,असे आरोपीचे नाव असून आरोपीविरोधात यापूर्वीही वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल होता.प्रकरण उघडकीस येताच नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे निर्देश दिले.शिपायाविरुद्ध पोलिसांनी पोक्सो कायदा,बाल न्याय अधिनियम तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान,आरोपी राजेश मालापुरे यास नागपूर येथील न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.विशेष म्हणजे,प्रकरणातील घटनाक्रमाची माहिती मिळवणे, विद्यार्थी-विद्यार्थिनी व संबंधितांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची पडताळणी करणे,तसेच प्रकरणाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली होती.आरोपीविरुद्ध यापूर्वीही आणखी अश्याच स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत कां?याचीही पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!