- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)’सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा पेटला आहे.या निर्णयाच्या निषेधार्थ गेल्या दोन दिवसांपासून खासगी दवाखाने ओस पडली आहेत. अश्यातच आज,गुरुवार ६ ऑगस्ट पासून खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण(आयपीडी) विभागही बंद ठेवण्याचा निर्णय खासगी डॉक्टरांनी घेतला आहे.त्यातच,नागपूरच्या मेयो आणि मेडिकलमधील निवासी डॉक्टरही पूर्ण ताकदीने संपात उतरल्याने नागपूरसह संपूर्ण विदर्भातील आपत्कालीन आणि वैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.शासकीय रुग्णालयांचा कणा मानल्या जाणाऱ्या निवासी डॉक्टरांनी सुरुवातीला बाह्यरुग्ण विभागावर(ओपीडी)बहिष्कार टाकला.परत आज गुरुवारी ओपीडी,आयपीडी व वॉर्डातील सेवाही ठप्प होण्याचा इशारा देण्यात आला आहे.यामुळे संपूर्ण विदर्भातून रुग्णांची सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत सीसीएमपी पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसीमध्ये नोंदणी देण्याची प्रक्रिया तत्काळ स्थगित करावी,अशी मुख्य मागणी मार्ड संघटने केली आहे. याशिवाय,निवासी डॉक्टरांची पदभरती,विद्यावेतनवाढ, सुरक्षितता,निवास व्यवस्था आणि शैक्षणिक सुविधा या प्रलंबित मागण्यांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. शासनाच्या भूमिकेवरच पुढील आंदोलनाची दिशा ठरेल, असा थेट इशाराही संघटनेने दिला आहे.
- Advertisement -

