Saturday, July 18, 2026
Homeगडचिरोलीविनापरवानगी दिव्यांग बांधवाच्या शेतात विहीरीचे खोदकाम- चुरचुरा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कारनामा- मुकुंदराव उंदिरवाडे...

विनापरवानगी दिव्यांग बांधवाच्या शेतात विहीरीचे खोदकाम- चुरचुरा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कारनामा- मुकुंदराव उंदिरवाडे यांनी केली कार्यवाहीची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- गडचिरोली गोकुलनगर वार्ड क्र.२३ स्थित दिव्यांग बांधव मुकुंदराव नारायण उंदिरवाडे यांची चुरचुरा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या महादवाडी येथील शेत जमिनीमध्ये चुरचुरा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिव्यांगत्वाचा व वयोवृध्दाचा फायदा घेऊन विनापरवानगी बळजबरीने विहीर बांधकामाचे खोदकाम करीत असल्याने ते त्वरीत बंद करून त्यावर कार्यवाही करण्या संबंधाने तहसीलदार गडचिरोली,संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती गडचिरोली,ठाणेदार पोलीस स्टेशन गडचिरोली यांना उंदीरवाडेंनी तक्रार करून संबंधितांवर कार्यवाहीची मागणी पत्रकाद्वारे केली आहे.

मुकुंदराव उंदिरवाडे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,३० मार्च २०२३ रोजी सरपंच ग्रामपंचायत चुरचुरा यांनी तुमच्या शेताला लागून विहीरीच्या बांधकामाकरीता खोदकाम करीत आहोत; असे फोनवरून सांगितले.३१ मार्च २०२३ ला सकाळुन माझा पुतण्या कैलास उंदिरवाडे रा.साखरा, यांना घेऊन प्रत्यक्ष जाऊन पाहीले असता भूमापन क्र. ४१/१ आराजी २.३७ हे.आर महादवाडी येथील माझे शेतात विहीरीच्या बांधकामाचे खोदकाम केल्याचे दिसुन आले.त्यामुळे माझे नुकसान झालेले आहे.माझी कोणतीही पूर्व परवानगी न घेता स्वतः च्या मनमर्जीप्रमाणे,बेजबाबदारीने वयोवृध्वाचा व दिव्यांगत्वाचा फायदा घेऊन बळजबरीने माझे शेतात विहीर बांधकामाचे खोदकाम केलेले आहे.

याची त्वरीत विनाविलंब कार्यवाही करून बांधकाम बंद करण्यांत यावे.दिव्यांगाचा व वयोवृध्दाचा फायदा घेऊन माझ्या मालमत्तेचा नुकसान करणाऱ्या सरपंच,उपसरपंच व सचिव ग्रामपंचायत चुरचुरा यांचेवर दिव्यांग व्यक्तीचा कायदा २०१६ व आपले अंतर्गत असलेल्या कायद्याप्रमाणे त्यावर कार्यवाही करण्यात यावी व दिव्यांग व्यक्तींना व वयोवृध्दांना सन्मानाने जगण्याचा व त्याचे मालमत्तेच्या संरक्षणाचा न्याय मिळवून देण्यात यावा; अशी मागणी दिलेल्या पत्रकात उंदीरवाडे यांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या समान निधी(Matching Schemes)व असमान निधी(Non-Matching Schemes)योजनांद्वारे राज्यातील शासनमान्य...

रेल्वेची धडक; सहा हरणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पारशीवनी तालुक्यातील कन्हान नगर परिषद हद्दीच्या तुकाराम नगर नजीकच्या रेल्वे स्टेशन परिसरातील ट्रॅकवर तब्बल सहा हरीण मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आज,शनिवार...

नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद शाळेत दोन डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन; प्रत्यक्ष मतदानातून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नैनपूर वार्ड येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत डिजिटल शिक्षण आणि लोकशाही मूल्यांचा सुंदर संगम अनुभवत आज,शनिवार १८...

शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणाऱ्या मोफत साडी योजनेला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल २४ लाख ५८ हजार कुटुंबातील महिलांना दरवर्षी दिवाळीच्या सणात मोफत दिली जाणारी साडी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!